JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कशी लागते माणसाला दारूची सवय?, शास्त्रज्ञांनी शोधलं त्यामागचं Interesting कारण..!

कशी लागते माणसाला दारूची सवय?, शास्त्रज्ञांनी शोधलं त्यामागचं Interesting कारण..!

दारूचं व्यसन मानवी शरीराला नेमकं लागतं तरी कसं? माणूस दारूच्या आहारी कसा जातो, याचा उलगडा एका अभ्यासातून झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 एप्रिल: अनेकांना दारूचं व्यसन असतं. दारुच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. दारुसाठी घरातलं साहित्य किंवा दागिने विकल्याच्या आणि दारूच्या नशेत वाईट कृत्य केल्याच्या बातम्या आपल्याला नेहमी कानावर पडत असतात. पण दारूचं व्यसन मानवी शरीराला नेमकं लागतं तरी कसं? माणूस दारूच्या आहारी कसा जातो, याचा उलगडा एका अभ्यासातून झाला आहे. मानवाला दारूचं व्यसन कसं लागतं, याचा शोध घेण्यासाठी माकडांवर (Research on Monkey) रिसर्च करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा रिपोर्ट रॉयल सोसायटी ओपन सायन्सच्या जर्नलमध्ये (Royal Society Open Science) प्रकाशित झाला आहे. बर्कलीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील बायोलॉजिस्ट रॉबर्ट डुडले 25 वर्षांपासून माणसांना लागणाऱ्या दारूच्या व्यसनावर संशोधन करत आहेत. 2014 मध्ये त्यांनी यावर एक पुस्तकही लिहिलं होतं, ज्यामध्ये दारूचं व्यसन माणसांना माकडांमुळे लागल्याचा इशारा त्यांनी दिला होता. वाईनच्या सुगंधामुळे माकडं फळे पिकण्याची वाट पाहतात, असंही त्यांनी म्हटलं होतं. सरकारी बंगल्यातून महागड्या वस्तू लंपास, काँग्रेसच्या मंत्र्यांनी नेलं डायनिंग टेबल, पंखे, फ्रीज, आणि बरंच काही..!   या संदर्भात रिसर्च करण्यासाठी माकडांनी खाल्लेली फळं आणि त्यांच्या लघवीचे नमुने अनेकवेळा तपासण्यात आले, त्यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या अभ्यासात असं आढळून आलंय की, माकडं अशी फळं शोधतात जी पिकल्यानंतर थोडीशी कुजलेली असतात. माकडांनी खाल्लेल्या फळांमध्ये (Fruits) 2 टक्के अल्कोहोल असतं. यानंतर, माणसांमधील दारूचं व्यसनाबाबत जाणून घेण्यासाठी एक नवीन अभ्यास करण्यात आला. कॅलिफोर्निया विद्यापीठातील बायोलॉजिस्टनी हा अभ्यास केला आहे. त्यांनी पनामामध्ये आढळणाऱ्या Black handed spider monkey या माकडाने खाल्लेली फळं आणि लघवीचे नमुने गोळा केले. या माकडांना कुजलेली फळं खायला आवडतात. त्या फळांमध्ये 1 ते 2 टक्के अल्कोहोलचे प्रमाण होते. हे प्रमाण लो-अल्कोहोल बीअरसारखं आहे. याशिवाय माकडांच्या विष्ठेमध्येही दारूचे काही अंश आढळले आहेत. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला गेला की माकडं दारूचा वापर एनर्जी (Energy) म्हणजेच ऊर्जा मिळवण्यासाठी करतात. या अभ्यासाचा उद्देश माणसांमध्ये दारू पिण्याची इच्छा माकडांमध्ये अल्कोहोल असलेली फळं खाण्यातून तर आली नाही ना?, याचा शोध घेणं होता. मात्र, कोणत्याही अभ्यासातून माकड अल्कोहोल असलेली किती फळं खातात? आणि त्यामुळे त्यांच्या वागणुकीत बदल होतो का?, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. हवेत बंद पडलं विमानाचं इंजिन, जीव धोक्यात टाकून पायलटनं केला खतरनाक स्टंट; Video दरम्यान, माकडांच्या या सवयींचा प्रभाव माणसावर झालेला असू शकतो, असा अंदाज आहे. परंतु, माकडं अल्कोहोल असलेली कुजलेली फळं खातात, त्याप्रमाणे माणसाने बियर पिण्यामागे माकडांची ही सवय कारणीभूत आहे की नाही, याबद्दल स्पष्ट माहिती कोणत्याही अभ्यासातून समोर आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या