JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दातांवर उपचारानंतर भलतंच घडलं; फुफ्फुसाचा रिपोर्ट पाहून रुग्णाला बसला धक्का

दातांवर उपचारानंतर भलतंच घडलं; फुफ्फुसाचा रिपोर्ट पाहून रुग्णाला बसला धक्का

दातांवर उपचार करताना व्यक्तीसोबत असं काही घडलं की त्याचा रिपोर्ट पाहून त्याच्यासह डॉक्टरही शॉक झाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 20 एप्रिल : अनेकदा आपण करायला एक जातो आणि त्याऐवजी दुसरंच काहीतरी होतं किंवा त्याचे भलेतच परिणाम होतात. काहीवेळा वैद्यकी उपचार, प्रक्रियांवेळीही असंच होतं. असाच आपला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे तो अमेरिकेतील एका व्यक्तीने. ज्याने दातांवर उपचार केले. पण त्यानंतर त्याने आपल्या फुफ्फुसांचा रिपोर्ट पाहिला आणि त्याला धक्काच बसला. अमेरिकेच्या इलिनॉयस स्टेटमधील 60 वर्षांचे टॉम जोज्सी (Tom Jozsi). दातांवर उपचार करण्यासाठी डेंटिस्टकडे म्हणजे दातांच्या डॉक्टरांकडे गेले. तिथं त्यांनी आपल्या दातात फिलिंग करून घेतलं  (Dental Filling Procedure). दातांवर केल्या जाणाऱ्या बऱ्याच प्रक्रियांपैकी एक फिलिंग आहे. पण दातांवर ही ट्रिटमेंट घेतल्यानंतर टॉम यांच्यासोबत जे घडलं ते धक्कादायक आहे (Man accidentally inhales drill bit into lung). हे वाचा -  खाल्लेल्याचं नीट digestion होतंय की नाही? तुम्ही स्वत: या गोष्टींवरून ओळखू शकता टॉम यांनी सांगितलं की, दातांचं फिलिंग करताना त्यासाठी डॉक्टर वापरत असलेल्या एका ड्रिलचा तुकडा त्यांच्या घशातून खाली गेला याची त्यांना कल्पनाच नव्हती. जेव्हा त्यांनी सीटी स्कॅन केलं तेव्हा हा ड्रिलचा तुकडा फक्त घशात नाही तर त्यांच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचल्याचं समजलं. एक इंच लांबीचा हा तुकडा होता. जेव्हा तो घशातून गेला तेव्हा त्यांना काहीच जाणवलं नाही. थोडा खोकला आला. सामान्य स्कॅनरमध्ये हे दिसलं नव्हतं. डॉक्टरांनी टॉम यांच्या फुफ्फुसात अडकलेला हा तुकडा बाहेर काढण्यासाठी कॅन्सर डिटेक्ट करणाऱ्या एका डिव्हाइसची मदत घेतली.  डॉक्टरांच्या मते, टॉम यांनी हा तुकडा गिळला नव्हता तर तो इनहेल केला होता. म्हणजे जेव्हा त्यांना खोकला आला तेव्हा कदाचित हा तुकडा श्वासनलिकेतून आत गेला असावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या