नवीन वर्ष
मुंबई, 17 डिसेंबर : 2022 संपून 2023 हे नवं वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दर वर्षीप्रमाणे यंदाही 31 डिसेंबरच्या रात्री उत्सव साजरा केला जाईल आणि 1 जानेवारीला नवीन वर्षाचं स्वागत केलं जाई. तुम्ही कधी विचार केला आहे का, की 1 जानेवारीपासूनच नवं वर्ष का सुरू होतं? वर्षात नेहमी 364 किंवा 365 दिवस आणि 12 महिने का असतात? वर्षाला 12 महिने देण्यात हिंदू दिनदर्शिकेची काही भूमिका आहे का? हिंदू, रोमन रिपब्लिकन आणि ग्रेगॅरियन कॅलेंडर केव्हा आलं? अशा काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या. सर्वप्रथम हिंदू दिनदर्शिकेबद्दल जाणून घेऊ या. हिंदू दिनदर्शिकेद्वारे तारखांची प्रणाली भारतात इसवी सन पूर्व 1000 वर्षांपासून वापरली जात आहे. याचा उपयोग हिंदू धार्मिक वर्ष ठरवण्यासाठी केला जातो. ते 12 चांद्र महिन्यांवर आधारित आहे. हिंदू कॅलेंडरमध्ये चांद्र वर्ष नेहमीच 354 दिवसांचं आणि सौर वर्ष 365 दिवसांचं असतं. प्रत्येक महिन्यात प्रत्येकी 15 दिवसांचे दोन पक्ष असतात. कधी तरी दोन तिथी एकाच दिवशी येतात. अशा परिस्थितीत, वर्षातल्या दिवसांची संख्या संतुलित करण्यासाठी अधिक मास आहे. सनातन परंपरेनुसार या मासात शुभ कार्यं केली जात नाहीत. हेही वाचा - अॅक्वेरियममध्ये कधीही अशा पद्धतीने ठेवू नका मासे, घरातील सुख-समृद्धी येईल संकटात हिंदू कॅलेंडरनंतर रोमन रिपब्लिकन कॅलेंडर इसवी सन पूर्व 738 मध्ये प्रचलित झालं. हे कॅलेंडर सुरुवातीला रोममध्ये प्रचलित होतं. त्यापूर्वी ग्रीक चंद्र कॅलेंडर इसवी सन पूर्व 800मध्ये ग्रीसमध्ये प्रचलित होतं. या कॅलेंडरमध्ये 354 दिवसांचं चांद्र वर्ष आणि 365 दिवसांचं सौर वर्ष असल्यानं नवीन खगोलशास्त्रीय गणनांऐवजी ती थेट हिंदू कॅलेंडर उचलून केली गेली, असं मानलं जातं. सुरुवातीच्या रोमन कॅलेंडरमध्ये 10 महिन्यांचं वर्ष व फक्त 304 दिवस होते. यामध्ये 61 दिवस दुर्लक्षित करण्यात आले होते. त्यामुळे ऋतूंच्या महिन्यात फरक पडत होता. या कॅलेंडरमध्ये मार्टिस, एप्रिलिस, माइस, जुनिस, क्विंटिलीस, सेक्सटिलिस, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशी महिन्यांची नावं होती. ज्यूलियन कॅलेंडरमध्ये 445 दिवसांचं वर्ष बर्याच काळानंतर, रोमचा शासक नुमा पोम्पी याने कॅलेंडर बदललं. त्यामध्ये जानेवारी हा पहिला आणि फेब्रुवारी हा शेवटचा महिना म्हणून जोडला गेला. इसवी सन पूर्व 452मध्ये फेब्रुवारी हा महिना जानेवारी ते मार्च या दोन महिन्यांच्या दरम्यान आणला गेला. इ. स. पूर्व पहिल्या शतकात रोमन कॅलेंडर खूप गोंधळात टाकणारं बनलं होतं. शेवटी, ज्युलियस सीझरने इसवी सन पूर्व 46मध्ये या कॅलेंडरमध्ये मोठ्या सुधारणा केल्या. त्यामुळे तारखांची नवीन प्रणाली स्थापन झाली. नवीन कॅलेंडरला ज्यूलियन कॅलेंडर असं नाव देण्यात आलं. सौर वर्षाची संकल्पना स्वीकारून ज्युलियसने वर्षातल्या दिवसांची संख्या 445 पर्यंत वाढवली. यामुळेही बराच गोंधळ निर्माण झाला आणि इसवी सन पूर्व 8पर्यंत त्याचा पूर्णपणे उपयोग होऊ शकला नाही.
ग्रेगॅरियन कॅलेंडरमध्येही आहे थोडा दोष सध्या प्रचलित असलेल्या कॅलेंडरला ग्रेगॅरियन कॅलेंडर म्हणतात. 1582मध्ये पोप ग्रेगरी-13 यांनी ज्यूलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा केल्यानंतर ते तयार केलं होतं. यामध्ये दर वर्षी 365 दिवस ठेवण्यात आले होते. त्याच वेळी दर चौथ्या वर्षी अतिरिक्त ‘लीप डे’ ठेवला गेला. एका सौर वर्षात 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटं आणि 42.25 सेकंद असतात. यामुळे या कॅलेंडरच्या अचूकतेमध्ये थोडा दोष आहे. यामुळे प्रत्येक शतकातलं हवामान आणि कॅलेंडरच्या तारखांमध्ये एका दिवसाचा फरक आहे. नवं वर्ष केव्हा साजरं केलं जातं? चैत्र शुक्ल प्रतिपदा ही हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते. त्याला हिंदू नवसंवत्सर असंही म्हणतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार, हिजरी नवीन वर्ष मोहरम महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होतं. ख्रिस्ती नागरिक 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरं करतात. सुमारे 4000 वर्षांपूर्वी बॅबिलोनमध्ये 21 मार्च रोजी नवीन वर्ष साजरं केलं जात होतं. नंतर, रोमन हुकूमशहा ज्युलियस सीझरने इसवी सनपूर्व 45 मध्ये ज्यूलियन कॅलेंडरची सुरुवात केली आणि जगात प्रथमच नवीन वर्ष 1 जानेवारीला साजरं केलं गेलं. हे सर्वांत लोकप्रिय आहे. सिंधी नववर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल द्वितीयेला चेटीचंद उत्सवानं होते. पंजाबमध्ये नवीन वर्ष बैसाखी उत्सव म्हणून साजरं केलं जातं. तो एप्रिलमध्ये येतो. शीख नानकशाही कॅलेंडरनुसार, नवीन वर्ष होळीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतं. जैन नववर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, तर पारशी नववर्ष ऑगस्टमध्ये नवरोजला सुरू होतं.