JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / या सवयींनुसार ओळखा गेल्या जन्मी तुम्ही कोण होतात? उघडेल पूर्वजन्मीचे रहस्य

या सवयींनुसार ओळखा गेल्या जन्मी तुम्ही कोण होतात? उघडेल पूर्वजन्मीचे रहस्य

Rebirth Secrets: ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, आपल्या सवयी, वागणं-बोलणं, खाणं-पिणं या गोष्टींवरून आपल्या पूर्वजन्माच्या खाणाखुणा ओळखता येऊ शकतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 05 जुलै: माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा मुक्त होतो आणि नवीन शरीर धारण करतो म्हणजेच त्याचा पुनर्जन्म (Rebirth) होतो असं मानलं जातं. जगभरातील अनेक देशांमध्ये यावर तथ्यावर विश्वास ठेवला जातो. इतर अनेक गोष्टींप्रमाणे पुनर्जन्माबाबत वैज्ञानिक पुरावा मिळालेला नसला, तरी आपल्या देशातील धार्मिक ग्रंथ, गीता, पुराण इत्यादींमध्ये पुनर्जन्माविषयी बरेच उल्लेख आहेत. एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजन्मातील संस्कार, सवयी (Habits), पुण्य-पाप त्याच्या पुढच्या जन्मातही त्याच्याबरोबर येतात, असं मानलं जातं. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, आपल्या सवयी, वागणं-बोलणं, खाणं-पिणं या गोष्टींवरून आपल्या पूर्वजन्माच्या खाणाखुणा ओळखता येऊ शकतात. माणसाला आपल्या आधीच्या जन्माबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता, कुतूहल असते. आपल्या सवयींवरून आपला पूर्वजन्म काय होता हे ओळखता येऊ शकतं. झी न्यूज इंडिया डॉट कॉमनं याबाबत वृत्त दिलं आहे. याबाबतीत आणखीही काही ठोकताळे आहेत. काहीवेळा मूल जन्माला येतानाच त्यांच्यामध्ये काही विशिष्ट गुण, अवगुण किंवा आजार असल्याचं दिसून येतं. या बाबी त्याच्या पूर्वजन्माशी निगडीत असल्याचं मानलं जातं. उदाहरणार्थ, काही मुलं लहानपणापासूनच खूप चांगली गातात किंवा नाचतात किंवा त्यांच्यात अगदी लहान वयातच काही खास कौशल्ये असतात. आधीच्या जन्मातही त्यांच्याकडे ही कौशल्ये होती, असं मानलं जातं. तसंच एखाद्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यावरुनही मागच्या जन्मात ती कशी होती हे जाणून घेता येऊ शकते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती उंटाप्रमाणे उठत असेल किंवा कोल्ह्यासारखी चलाख असेल किंवा खाताना चमत्कारिक आवाज काढत असेल तर समजून जावं की ही त्यांची गतजन्माची सवय आहे. हेही वाचा-  मुलींच्या शर्टला का नसतो खिसा? तुम्हालाही पडला असेल हा प्रश्न तर वाचा.. बहुतेक लोकांचा त्याच घरात, कुटुंबात (Family) पुन्हा जन्म होतो जिथं त्यांचा मृत्यू होता. जे लोक नेहमी आपल्या कुटुंबाबद्दल काळजीत असतात किंवा मृत्यूप्रसंगीही (Death) आपल्या कुटुंबाचा विचार करत असतात. त्यांचा जन्म पुन्हा त्याच घरात होतो, असं मानलं जातं. एखाद्या व्यक्तीच्या शेवटच्या क्षणीही ज्या आठवणी मनात राहतात, त्यानुसार त्याचा पुढचा जन्म ठरतो. शेवटच्या क्षणी कुटुंबाची काळजी करणाऱ्या व्यक्तीचा त्याच कुटुंबात त्याचा पुन्हा जन्म होतो, असं म्हणतात. मात्र अशा पूर्वजन्माच्या सवयी, आठवणी त्रासदायक ठरतात. अशावेळी यातून सुटका कशी मिळवावी याचे काही उपायही सांगण्यात आले आहेत. पूर्वजन्मातील सवयींपासून सुटका मिळवण्यासाठी या जगाचे पहिले गुरु भगवान शंकर (Lord Shiva) यांची पूजा करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. याशिवाय एकादशी आणि पौर्णिमेला उपवास करण्याचं व्रतही करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या