JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Virgin राहणार म्हणाली आणि 10 वर्षांतच झाली 10 मुलांची आई; आणखी बाळांचं प्लॅनिंग

Virgin राहणार म्हणाली आणि 10 वर्षांतच झाली 10 मुलांची आई; आणखी बाळांचं प्लॅनिंग

व्हर्जिन ब्राइड (Virgin bride) म्हणून ओळखली जाणारी ही महिला आता 11 मुलांची आई आहे. तिला पुन्हा प्रेग्नंट व्हायचं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 11 मे : अशा कितीतरी व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील की मी लग्न करणार नाही, मी ब्रह्मचारीच राहणार, मी सिंगलच राहणार असं म्हणतात. पण अशाच व्यक्ती सर्वांच्या आधी लग्न करून मोकळ्याही होतात. अशाच एका महिलेनंही आपण काय व्हर्जिन राहणार असल्याचं म्हटलं होतं. पण याच महिलेनं फक्त 10 वर्षांतच तब्बल 10 मुलांना जन्म दिला (Virgin bride gave birth to 10 babies in 10 years) आहे. तितक्यावरच ती थांबली नाही तर आणखी पुढच्या बाळांचंही ती प्लॅनिंग करते आहे. न्यू मेक्सिकोतील कॉर्टनी रोजर्स व्हर्जिन ब्राइड (Virgin bride) म्हणून तिची ओळख होती. आता ती 11 मुलांची आई आहे. तिला पुन्हा प्रेग्नंट व्हायचं आहे. कमीत कमी आणखी तीन बाळांना जन्म देण्याची तिची इच्छा आहे. तरुण असताना कॉर्टनीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एका चर्चमध्ये ती पास्टर ख्रिसला भेटली. दोघांचं प्रेम जुळलं आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2008 साली कॉर्टनी आणि पास्टरने लग्न केलं. तेव्हापासून दहा वर्षांत तिने दहा मुलांना जन्म देऊन सर्वांना धक्काच दिला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच या कपलने आपल्या अकराव्या मुलाला जन्म दिला. आता दोघंही आणखी तीन मुलांचं प्लॅनिंग करत आहेत. हे वाचा -  Online Video पाहून ब्युटी ट्रिटमेंट पडली महागात; सुंदर चेहऱ्याची लागली वाट अकरा मुलांना सांभाळतानाच या दाम्पत्याच्या नाकी नऊ येतात. अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो आहे. घर लहान आहे. त्यातच इतके जण कसेबसे राहता. महिन्याचं रेशन ऐकून तर तुम्हाला शॉकच बसेल. जवळपास 84 हजार रुपयांचं रेशन त्यांना लागतं. एक वेळ तर अशीही आली होती की त्यांचे खाण्याचे वांदे झाले होते. मुलांचं पोट भरावं म्हणून मग दोघांनीही नाश्ता आणि रात्रीचं जेवण करणंच सोडलं होतं.  मुलांना शाळेत सोडण्यासाठीही 15 सीटर गाडी वापरावी लागते. हे वाचा -  जन्मानंंतर ना रडलं, ना त्याचं हृदय धडधडलं; 11 मिनिटांनी बाळाने घेतला पहिला श्वास घरखर्चाबाबत सांगताना कॉर्टनीने सांगितलं, ती मुलांचे कपडे विकते. यावर्षी जानेवारीत त्यांच्याकडे आर्थिक चणचण खूपच होती. त्यावेळी आपल्या खाण्यात त्यांनी बचत केली. लॉकडाऊनमध्ये मुलांना ते दोघंही घरीच शिकवतात. पण तरी मूल जन्माला घालण्याचा त्यांना कंटाळा नाही आला आणि तीन मुलांना आपल्या कुटुंबात आणण्याचा विचार त्यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या