Vastu tips
मुंबई, 17 डिसेंबर : जीवनात सुख-समृद्धी यावी असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो. यश, पैसा मिळत नाही, घरात सतत अशांतता असते अशा स्वरूपाचे प्रश्न सध्या अनेक जणांना भेडसावत आहेत. यासाठी काही जण वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचा सल्ला घेतात. जीवनातल्या सुख-समृद्धीचा संबंध वास्तूशीदेखील असतो, असं जाणकारांचं मत आहे. वास्तूची रचना योग्य असेल, घरात वस्तू योग्य दिशेला ठेवल्या असतील तर जीवनात सुख-शांती, पैसा, यश मिळतं; मात्र वास्तूची रचना चुकीची असेल तर जीवनात सातत्याने समस्या वाढताना दिसतात. याशिवाय घरातल्या काही गोष्टींमुळेदेखील अडचणी निर्माण होऊ शकतात. घरात कोळ्याचं जाळं असेल तर पैसा टिकत नाही. यश आणि समाधान मिळत नाही. वास्तूशी संबंधित काही नियमांचं पालन केलं तर समस्या दूर होऊ शकतात. या नियमांविषयी जाणून घेऊ या. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती दिली आहे. घरात कोळ्याची जाळी-जळमटं होणं हा मोठा वास्तुदोष मानला जातो. यामुळे कुटुंबाची प्रगती खुंटते. घराची साफसफाई करताना एखादा कोपरा तसाच राहिला तर तिथं जाळं, धूळ साचते; मात्र काही वेळा याकडे आपलं दुर्लक्ष होतं. घरात जाळी-जळमटं असणं हे दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं. यामुळे जीवनात यश आणि समाधान मिळत नाही. नकारात्मकता वाढतं. हेही वाचा - 1 जानेवारीला का साजरं केलं जातं नवीन वर्ष? ज्या घरात रोज स्वच्छता होत नाही, त्या घरात लक्ष्मी टिकत नाही. कितीही पूजा-विधी केले तरी इच्छित फलप्राप्ती होत नाही. घरात स्वच्छता नसेल, घरात जाळी-जळमटं असतील तर लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, असं वास्तुशास्त्राचे जाणकार सांगतात. वास्तुशास्त्रानुसार, घरात कोळ्याचं जाळं असणं हे दारिद्र्याचं लक्षण असतं. अशा घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. तसंच कुटुंबातल्या सदस्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्या घरात कोळ्याची जाळी, धूळ असते, त्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. घरातलं वातावरण सुखद नसतं. घरात वाद-विवाद होतात आणि वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.
ज्या घरात जाळं असतं त्या घराच्या कुटुंबप्रमुखाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कुटुंबप्रमुख आणि घराची प्रगती थांबते. तसंच यामुळे आरोग्यावरही परिणाम होतो, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. घरात जाळी-जळमटं, अस्वच्छता असेल तर तुम्ही कितीही पूजा-विधी केले, तरी त्याची शुभ फळं प्राप्त होत नाहीत. त्यामुळे कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी घराची साफसफाई करणं गरजेचं आहे. तसंच घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात कोळ्याची जाळी नाहीत ना, याची खात्रीदेखील शुभ कार्यापूर्वी करणं गरजेचं आहे.