3. गंगाजल- हिंदू धर्मात गंगाजलाचे विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. हिंदू धर्मात गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे पूजास्थळी गंगाजल अवश्य ठेवावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात.
भरपूर पैसा (Money) मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक जण हर तऱ्हेने प्रयत्न करत असतो. व्यवसाय, नोकरी, गुंतवणूक, बचत या मार्गातून भरपूर पैसा (Money) मिळावा यासाठी सर्व जण प्रयत्नशील असतात. परंतु, खूप मेहनत आणि भरपूर प्रयत्न करूनही एक तर अपेक्षित प्रमाणात पैसा मिळत नाही किंवा पैसा मिळाला तरी तो टिकत नाही, अशी समस्या वारंवार ऐकायला मिळते. ही समस्या लवकरात लवकर सुटावी म्हणून काही जण आध्यात्मिक मार्गाने जातात. काही जण ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्रतज्ज्ञाचा सल्लादेखील घेतात. घरात गरिबी येण्यास कारणीभूत ठरत असलेल्या अनेक गोष्टी वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) सांगितलेल्या आहेत. या चुका आपली आर्थिक प्रगती आणि यशात अडथळे आणतात. वास्तुशास्त्रात यश आणि भरभराटीसाठी ज्या गोष्टी टाळायला सांगितल्या आहेत, त्या जाणून घेऊ या. या संदर्भात माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. बेडवर बसून जेवणं वास्तुशास्त्रानुसार, पलंगावर बसून जेवण्यास सक्त मनाई आहे. असं केल्याने जीवनात अनेक समस्या येतात. या चुकीचा आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या सवयीमुळे पैशांचं नुकसान होऊन कर्ज वाढू शकतं. देवघरात समोरासमोर ठेवलेल्या देवाच्या मूर्ती, फोटो वास्तुशास्त्रानुसार, देवघरात समोरासमोर देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने घरात कलह निर्माण होतो. शिवाय यामुळे घरात नकारात्मकता येते. त्यामुळे ही चूक करू नका. रात्री किचन अस्वच्छ ठेवणं अनेक घरांमध्ये रात्री जेवणानंतर किचन (Kitchen) स्वच्छ केलं जात नाही. अशा चुकीमुळे संपत्तीची देवता श्री लक्ष्मी संतापते. त्यामुळे आठवणीने किचन स्वच्छ करा आणि भांडीही रात्रीच घासून घ्या. घरात पाण्याची रिकामी भांडी रात्रीच्या वेळी घरात पाण्याची (Water) भांडी कधीही रिकामी ठेवू नयेत. मग ती बाथरूममध्ये ठेवलेली बादली असो किंवा किचनमध्ये ठेवलेलं पिण्याच्या पाण्याचं भांडं असो. ही भांडी नेहमी भरून ठेवावीत. पाण्याच्या रिकाम्या भांड्यांमुळे आर्थिक अडचणी येतात, असं वास्तुशास्त्रानुसार म्हटलं जातं. घराच्या मुख्य दारात कचरा ठेवणं घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवणं चांगल्या आर्थिक स्थितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. घराच्या मुख्य दारात कधीही कचरा किंवा डस्टबिन (Dustbin) ठेवू नका. तसंच दारावर कोळ्याची जाळी नाहीत, याची खात्री करा. दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. याशिवाय दरवाजा उघडताना कोणताही अडथळा येऊ नये आणि दरवाज्याचा आवाज येऊ नये, याची काळजी घ्या. यामुळे घरात गरिबी येते आणि भांडणं होतात, असं मानलं जातं. पाण्याचा अपव्यय कधीही पाण्याचा अपव्यय करू नका. तसंच घरातला कोणताही नळ गळत नाही, याची काळजी घ्या. पाण्याच्या अपव्ययामुळे धनाची हानी होते आणि मान-सन्मान कमी होतो, असं मानलं जातं. तुम्हीही घरात या चुका करत असाल, तर त्या टाळा. या चुका टाळल्यास घरात भरभराटी आणि संपन्नता येईल. तुमच्या घरात नेहमी प्रसन्नता राहील. Keywords – Link - हसू