JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / महिलेची फूड प्रिझर्व्हिंगची अनोखी पद्धत; तब्बल आठ महिन्यांसाठी स्वयंपाकाला सुट्टी

महिलेची फूड प्रिझर्व्हिंगची अनोखी पद्धत; तब्बल आठ महिन्यांसाठी स्वयंपाकाला सुट्टी

Kitchen Hacks: रोजचा स्वयंपाक कोणासाठीही कंटाळवाणा असू शकतो यात शंका नाही. अशा परिस्थितीत या महिलेने सुचवलेली ही युक्ती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट : जेवण (Food) बनवणं प्रत्येकालाच आवडतं असं नाही. परंतु, तरीही महिलांना जेवण बनवावंच लागतं. स्त्री कितीही शिकलेली असू दे किंवा गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत असेल, तरी तिला स्वयंपाक करावाच लागतो. एखाद वेळी कंटाळा आला असेल तर बाहेरून मागवलं जातं किंवा सर्वजण बाहेर जाऊन जेवून येतात. घरात कामाला बाई असेल आणि ती आली नसेल, तरी जेवळ करण्याची वेळ येतेच. नेहमीसाठी यावर पर्याय नसतो. अनेक नोकरदार महिलांना ऑफिसमधून थकून आल्यावरही स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात जावं लागतं; पण एका महिलेने यावर भन्नाट तोडगा काढला आहे. एका अमेरिकन महिलेने अशी पद्धत अवलंबली आहे, की ती पुढचे 8 महिने स्वयंपाक न करता आपल्या कुटुंबाला खाऊ घालू शकते. या संदर्भातलं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिलं आहे. अमेरिकेत इंडियाना येथे राहणार्‍या केल्सी शॉने (Kelsey Shaw) येत्या 8 महिन्यांसाठी तिच्या कुटुंबासाठी 426 प्रकारचे पदार्थ तयार करून प्रिझर्व्ह (Preserve) केले आहेत. केल्सी एका शेताची मालकीण आहे आणि तिने 2017 पासून अन्न प्रिझर्व्ह करून ठेवण्याची पद्धत अवलंबली आहे. ती डिहायड्रेशन आणि कॅनिंगसारख्या पद्धतींद्वारे अन्न साठवते. केल्सीच्या म्हणण्यानुसार, तिचे कुटुंबीय उन्हाळ्यात शेतातली ताजी फळं आणि इतर भाज्या खातात. परंतु, केल्सी उर्वरित महिन्यांसाठी अन्न प्रिझर्व्ह करून ठेवते. या प्रिझर्व्ह्ड पद्धतीने आम्ही फूड सप्लाय विस्कळीत करणाऱ्या कोणत्याही संकटासाठी आणि नैसर्गिक आपत्तीसाठी तयार असतो, असं ती म्हणते. खाण्याचे पदार्थ प्रिझर्व्ह करण्यासाठी केल्सीला दिवसातून किमान दोन तास द्यावे लागतात. या प्रिझर्वेशन पद्धतीने तिने जॅम, लोणची, पास्ता (Pasta) असे अनेक पदार्थ प्रिझर्व्ह केले आहेत. त्यामुळे कोरोना (Corona) महामारीच्या काळातही त्यांना कोणतेच पदार्थ आणण्यासाठी बाहेर जावं लागलं नाही. वाचा - Healthy Stomach : जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिणे ठरू शकते घातक! असे वाढावा मेटॅबॉलिझम अन्न प्रिझर्व्ह कसं केलं जातं? ताजं अन्न खाणं हे आरोग्यासाठी सर्वांत उत्तम आहे. काही पदार्थ जपून ठेवण्याची सवय तुम्ही स्वतःला लावू शकता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला स्वयंपाक करायची इच्छा नसते किंवा कोणत्याही कारणाने तुम्ही जेवण बनवू शकत नाही, तेव्हा तुम्ही कमीत कमी प्रयत्नात फक्त चपाती किंवा भात तयार करून प्रिझर्व्ह केलेलं अन्न खाऊ शकता. - तुम्ही फळं, भाज्या, कडधान्ये आणि मासे वाळवून प्रिझर्व्ह करू शकता. - वड्या, पापड, मसाले, मुळा वगैरे उन्हात वाळवून प्रिझर्व्ह करता येतात. - अन्न कोरडं शिजवून प्रिझर्व्ह करता येतं. विशेषतः मांस प्रिझर्व्ह करून ठेवता येतं. त्याला ओलावा लागला नाही, तर ते कुजत नाही. - याशिवाय मटार, पास्ता, सॉस इत्यादी फ्रीज करून दीर्घ काळ प्रिजर्व्ह करता येतात. केल्सीच्या या प्रिझर्व्ह पद्धतीचा अवलंब करून अन्न घरात साठवू शकता. यामुळे तुम्हाला मोसमी फळं आणि पालेभाज्यांचा आस्वाद इतर मोसमात घेता येऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या