JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अभ्यासासाठी Internet कसा कराल वापर; IAS ऑफिसर अंशुमन राज यांचा यशाचा मूलमंत्र

अभ्यासासाठी Internet कसा कराल वापर; IAS ऑफिसर अंशुमन राज यांचा यशाचा मूलमंत्र

IAS ऑफिसर अंशुमन राज (IAS Officer Anshuman Raj) यांनी UPSCची परीक्षा 4 वेळा दिली आणि शेवटी अपेक्षीत यश (Success) मिळवलं.

जाहिरात

साली UPSC परीक्षेमध्ये 107 रँक मिळवून अंशुमन राज IAS ऑफिसर बनले आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 28 जून: भारतामध्ये अनेक मुलं अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSCची परीक्षा (UPSC Exam) देतात. मात्र IAS ऑफिसर बनण्यासाठी मेहनतीने अभ्यास करावा लागतो. यूपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम खूप मोठा असल्यामुळे अभ्यास नेमका कसा करावा याचा विचार मुलांच्या मनात येत असतो. अशा विद्यार्थ्यांसाठी IAS ऑफिसर अंशुमन राज (IAS Officer Anshuman Raj) यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 2019 साली UPSC परीक्षेमध्ये 107 रँक मिळवून अंशुमन राज IAS ऑफिसर बनले आहेत. बिहारच्या (Bihar) बक्सरमध्ये राहणारे अंशुमन राज यांनी लहानपणापासूनच IAS ऑफिसर बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. कोलकत्तामध्ये (Kolkata) ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी UPSCच्या तयारीसाठी पूर्णवेळ अभ्यास करायला सुरुवात केली. UPSCची परीक्षा पास होण्यासाठी त्यांनी 3 वेळा प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. मात्र त्यांनी 2019 मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि अधिकारी बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. अंशुमन राज सांगतात UPSC परीक्षेमध्ये प्लॅनिंगने अभ्यास करायला हवा. ( इंग्रजी बोलायला घाबरणारे अभिषेक शर्मा बनले IAS ऑफिसर; कठोर मेहनतीने गाठलं ध्येय् ) पुस्तकं कोणती वापरायची हे आधीच ठरवलं पाहिजे. त्याकरता अभ्यासाची चांगली रणनीती तयार करता येऊ शकते. शिवाय इंटरनेटचा (Internet) फायदा घेता येऊ शकतो. मेहनतीशिवाय स्मार्ट वर्कवर देखील भर द्यावा. ( फक्त एका फुफ्फुसासह कोरोनाशी लढली; 12 वर्षांच्या दिव्यांग मुलीची व्हायरसवर मात ) अंशुमन राज सांगतात दिल्लीमध्ये यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करता येतं असं नाही. आपण आपल्या घरी राहूनसुद्धा अभ्यास करू शकतो. राज यांनी UPSC परीक्षेच्या अभ्यासासाठी इंटरनेटचा वापर केला. यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांचे इंटरव्यू पाहिले त्यामुळे अभ्यासाची रणनीती ठरवता आली. त्याशिवाय रिवीजन आणि रायटिंग प्रॅक्टिसवर देखील भर दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या