सतीश मेनन यांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती
नवी दिल्ली, 19 जुलै: यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असाल. अभ्यास नेमका कसा करायचा? क्लासेस कोणते असावेत? किती तास अभ्यास करावा? अशा अनेक शंकांमुळे तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होत असेल तर, सतीश मेनन यांच्याकडून तुम्ही नक्कीच आदर्श घेऊ शकता. सतीश मेनन यांनी कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय आणि इंटरनेटच्या वापराशिवाय युपीएससी परीक्षेमध्ये (UPSC Exam) 432 रँक मिळवला आहे. सतीश मेनन (Satheesh Menon) यांचे वडील रोजंदारीवर काम करायचे तर, आई गृहिणी आहे. कुटुंब अतिशय गरीब असल्याने वडिलांना हातभार लावण्यासाठी ते स्वतः आज विद्यार्थ्यांची शिकवणी घेत. त्यांच्याकडे इंटरनेटच्या (Internet) वापरासाठी खर्च करण्याइतके पैसे नव्हते. याशिवाय कोणत्याही क्लासला जाण्यासाठी फी भरण्याचीही त्यांची परिस्थिती नव्हती. त्यामुळे त्यांनी केवळ स्वतःच्या आत्मविश्वासावर ही परीक्षा पास करून आपल्या कुटुंबाचं भवितव्य बदललं आहे.
पावसाळ्यात वाढतोय विविध आजारांचा धोका; या सोप्या Tips वापरून लहान मुलांना ठेवा सुरक्षित
सतीश मेमन केरळच्या (Kerala) एर्नाकुलम जिल्ह्याच्या उदयमपेरुर गावचे राहणारे आहेत. त्यांना बारावीनंतर इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्याची इच्छा होती मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी केवळ ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी एर्नाकुलम मधल्या पब्लिक लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास केला. पण, क्लास घेत असल्यामुळे त्यांना कधीकधी आठवड्यातून एकदाच लायब्ररीत जाण्याचा वेळ मिळायचा.
‘वर्क फ्रॉम होम’ मुळे वाढली पाठदुखी; ‘हे’ छोटे बदल देतील आराम
याशिवाय इंटरनेट कनेक्टिविटी नसल्यामुळे त्यांना सायबर कॅफेमधे जाऊ माहिती गोळा करावी लागायची. त्याआधी सतीश यांची निवड राज्य सरकारी कर्मचारी वर्गामध्ये क्लार्क पदासाठी झाली होती. मात्र त्यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि 432 रँक मिळवुन दाखवला. त्यांच्या या मेहनतीमुळे आता त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बदललेली आहे.