JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अरे बापरे! मृत बायकोच्या मोबाईल नंबरवरून आला मेसेज; पाहूनच हडबडला नवरा

अरे बापरे! मृत बायकोच्या मोबाईल नंबरवरून आला मेसेज; पाहूनच हडबडला नवरा

मृत बायकोच्या मोबाईल नंबरवर तो मेसेज करत राहिला आणि अखेर एक दिवस रिप्लाय आला.

जाहिरात

ही प्रोसेस फॉलो करून Android स्मार्टफोनमध्ये फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करू शकता.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्रिटन, 25 जून: आपली एखादी प्रिय व्यक्ती आपल्या कायमची सोडून गेली (Dead person) की ती आपल्या आयुष्यात पुन्हा यावी, ती आपल्याला एकदा तरी दिसावं, तिने आपल्याला एकदा तरी फोन करावा किंवा तिने आपल्याला किमान एक मेसेज तरी करावा, असं आपल्याला वाटतंच. आपल्याला कितीही वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र ते शक्य नाही. पण यूकेतील एका नवऱ्याला (Husband sends text message to late wife) मात्र त्याच्या मृत बायकोच्या मोबाईल नंबरवरून मेसेज (Message to Husband from late wife mobiel number)  आला आणि त्याला धक्काच बसला. नवरा आणि बायको (Husband wife) इतर नात्यांपेक्षा खूप वेगळं असतं. कितीही भांडणं झाली तरी दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना असंच या दोघांचं असतं. त्यामुळेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहण्याचं वचन देणारा जोडीदार काही कारणामुळे अचानकपणे अर्ध्या संसारातच साथ सोडून गेला तर त्याचा मोठा धक्का बसतो. आपला लाइफ पार्टनर आपल्यासोबत नाही हे माहिती असतं पण मन काही ते मानायला तयार नसतं. पण त्यातून काहीतरी विचित्र घडतं. असंच घडलं ते यूकेतील या व्यक्तीसोबत. या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. पण तरी तो तिच्या मोबाईल नंबरवर किती तरी वर्षे मेसेज पाठवत होता. त्याच्या मेसेजला काही रिप्लाय येत नव्हता तरी त्याने मेसेज पाठवणं काही थांबवलं नाही. आणि एक दिवस अखेर त्या नंबरवरून मेसेज आला आणि नवरा हडबडलाच. हे वाचा -  पप्पी दे म्हणत पठ्ठ्याने रस्त्यावरच मांडला ठाण; तरुणीने काय केलं ते तुम्हीच पाहा मिरर यूके च्या रिपोर्टनुसार या व्यक्तीच्या बायकोचा मृत्यू होऊन अनेक वर्षे झाली. या व्यक्ती पत्नीच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला होता. आपली पत्नी या जगात नाही हे मानायला तो तयारच नव्हता. त्यामुळे तो तिच्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठवत राहिला. दरवर्षी मदर्स डे दिवशी तो आपल्या बायकोला मेसेज करायचा आणि एक दिवस असं घडलं ज्याची कल्पना ना व्यक्तीने केली आणि दुसऱ्या कुणी. मदर्स डे दिवशी त्याने मेसेज पाठवला आणि त्याला रिप्लाय आला. ते पाहून तो शॉक झाला. त्या नंबरवरून तुम्ही कोण आहात असा रिप्लाय आला. रिप्लाय पाहिल्यानंतर त्या व्यक्तीनेही कुणाकडून तरी पहिल्यांदा मला रिप्लाय आला आहे, असं सांगितलं आणि पुन्हा मेसेज नाही पाठवणार, मला माफ करा, असं म्हणत माफीही मागितली. हे वाचा -  OMG! प्रेमाचा भावनांशी संबंध नाही; कसं काय बरं? मग काय होतो नेमका केमिकल लोच्या? जर या व्यक्तीची बायको या जगात नव्हती तर मग तिच्या मोबाईल नंबरवरून मेसेजला रिप्लाय आला तरी कसा. हे नेमकं काय प्रकरण होतं. तर मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीच्या पत्नीचा मोबाईल नंबर दुसऱ्या व्यक्तीला अलॉट करण्यात आला होता. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या