लडाख, 11 सप्टेंबर: गेल्या दीड वर्षापासून जगभरात पसरलेल्या कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) लोकांच्या घराबाहेर पडण्यावर अनेक निर्बंध आले होते. आता लसीकरणामुळे धोका कमी झाल्याने हळूहळू निर्बंध कमी होत असून, जनजीवन पूर्ववत होत आहे. लोक जवळपासच्या ठिकाणी किंवा जिथं कोरोनाचा धोका कमी आहे आणि जी पर्यटनस्थळं खुली झाली आहेत, अशा ठिकाणी सहलीला (Trip) जाऊ लागले आहेत. कोरोनामुळे आलेला ताण दूर करण्यासाठी कुटुंबासमवेत, मित्र-मैत्रिणींसमवेत निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवण्यासाठी नागरिक आतुर आहेत. पर्यटन कंपन्याही (Tourism Companies) पर्यटनासाठी खुल्या असणाऱ्या ठिकाणांच्या सहलीचं आयोजन करत आहेत. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉमने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आपल्या देशातही अनेक जण आता पर्यटनासाठी (Tourism) बाहेर पडत असून, सहलींचं नियोजन करत आहेत. आपल्या देशात अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत. त्यापैकी पर्यटकांचे आवडतं ठिकाण आहे ते म्हणजे लडाख (Ladakh). सर्वांत जास्त उंचीवर असलेलं हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. थंडगार हवामान, बर्फाच्छादित पर्वत, सुंदर तलाव आणि शांत वातावरण यामुळे अत्यंत रमणीय असलेलं लडाख नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतं. विशेष म्हणजे वर्षभर कधीही लडाखला जाता येतं; पण सप्टेंबर महिन्यात (September) इथं भेट देण्यात एक वेगळी मजा आहे. यामागे अनेक कारणं आहेत. सप्टेंबर महिन्यात लडाखला भेट देणं आर्थिकदृष्ट्याही लाभदायक ठरतं.
मुलांना Nutritional Drinks देताय; पण खरंच याचा काही फायदा होतो का?
सप्टेंबर महिन्यात लडाखमध्ये नारोपा महोत्सव (Naropa Festival) होतो. हिमालयातला कुंभमेळा (Kumbh Mela in Himalaya) म्हणूनही हा महोत्सव ओळखला जातो. बौद्ध भिक्षू नारोपा यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव साजरा केला जातो. नृत्य, संगीत, धार्मिक कार्यक्रम यांची या महोत्सवात रेलचेल असते. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लोकांना बौद्ध परंपरांचं, लडाखमधल्या संस्कृतीचं दर्शन होतं. याच दरम्यान, लडाखमध्ये थंडीची (Cold) सुरुवात होते. त्यामुळं इथे लोकांची गर्दीही कमी असते. पर्यटनाचा ऑफ सीझन असल्यानं हॉटेल्सही (Hotels) स्वस्त दरात मिळतात. या महिन्यात हॉटेल्स 50 टक्के सूट देतात. लोकांची गर्दी नसल्यानं पॅन्गॉन्ग लेकसारखी (Pangong Lake) रमणीय ठिकाणं निवांतपणे बघता येतात. गर्दी नसल्यानं या निसर्गरम्य स्थळांचा शांतपणे अनुभव घेता येतो.
सप्टेंबर महिन्यात विमानांचे तिकीट दरदेखील (Air Fare) स्वस्त असतात. तुम्ही रस्त्यामार्गे (By Road) लडाखला जाण्याचा विचार करत असाल तर या काळात तोदेखील उत्तम अनुभव ठरतो. या महिन्यात खूप कमी जण लडाखला जात असल्याने या मार्गावर रहदारी खूप कमी असते. त्यामुळं नुब्रा व्हॅली किंवा त्सो मोरीरी लेकसारख्या ठिकाणीही सहज पोहोचता येतं. हा प्रवासही अविस्मरणीय ठरतो.
Fruits: सूर्यास्तानंतर खाऊ नका ‘ही’ फळं नाही तर होतील ‘हे’ धोकादायक आजार
त्यामुळे लडाखच्या सौंदर्याची, संस्कृतीची शांतपणे अनुभूती घ्यायची असेल, तर सप्टेंबर महिना हा अगदी योग्य काळ आहे. सप्टेंबर महिन्यात तुम्ही अगदी स्वस्तात मस्त अशी लडाख सहल करू शकता.