JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश

कोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश

संशोधकांनी तयार केलेल्या अँटिव्हायरल थेरेपीमुळे फुफ्फुसातील 99.9 टक्के कोरोनाव्हायरसचा खात्मा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जाहिरात

त्यामुळे फुकेत सारख्या बेटांवर सर्वातआधी बेटावरील 70% जनतेला व्हॅक्सिनेशन करण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. त्यानंतर हा प्रदेश पर्यटकांसाठी देखील खुला होणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिडनी, 18 मे : सध्या कोरोना रुग्णांवर वेगवेगळ्या औषधांनी उपचार केला जात आहे. लक्षणांनुसार कोरोना रुग्णांना औषधं देऊन त्यांना होणाऱ्या समस्या कमी केल्या जात आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सर्वाधिक चर्चेत असलेलं औषध म्हणजे रेमडेसिवीर. पण याशिवाय कोरोनावर अजूनही बरीच औषधं तयार करण्यात आली आहेत आणि काही तयार केली जात आहेत. त्यापैकीच एक औषध ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी  तयार केलं आहे. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी कोरोनावर उपचारासाठी एक अँटिव्हायरल औषध तयार केलं आहे. हे औषध कोरोनाव्हायरसचा पूर्णपणे खात्मा करतं, असा दावा या संशोधकांनी केला आहे.  ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीच्या मेन्जिस हेल्थ इन्स्टीट्यूटने हे औषध तयार केलं आहे. रिपोर्ट नुसार जीन साइलेसिंग या  पद्धतीने हे औषध तयार करण्यात आलं आहे. या पद्धतीत आरएनएचा उपयोग व्हायरसवर हल्ला करण्यासाठी केला जातो. याआधी फायइर आणि मॉडर्नाची लस अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे. हे वाचा -  पुण्यात म्युकरमायकोसीसच्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा, रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट ज्यांना गंभीर स्वरूपाचा कोरोना झाला आहे आणि कोरोना लसही त्यांच्यावर प्रभावी ठरत नाही आहे, अशा लोकांसाठी ही नवी थेरेपी तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. इंजेक्शनमार्फत हे औषध दिलं जाईल. याचा उंदरांवर प्रयोग करण्यात आला, जो यशस्वी ठरला आहे. या औषधाने उंदरांच्या फुफ्फुसातील 99.9 टक्के कोरोनाव्हायरसचा खात्मा केला आहे. हे पहिलं असं औषध असेल जे कोरोनाव्हायरसला पूर्णपणे नष्ट करू शकेल, असा दावा करण्यात आला आहे. शिवाय सामान्य पेशींवरही या औषधाचा काहीच दुष्परिणाम होत नाही, असं सांगितलं जातं आहे. हे वाचा -  मुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट मुख्य संशोधक निगेल मॅकमिलन यांनी सांगितलं, या ट्रिटमेंटमुळे व्हायरसला नवं रूप धारण करण्यापासूनही रोखता येऊ शकतं. या उपचारामुळे जगभरात कोरोनामुळे होणारे मृत्यूंची संख्या कमी होईल, अशी आशा त्यांना आहे. गेल्या वर्षीपासूनच या औषधावर काम सुरू होतं. या औषधाची चाचणी आता उंदरांवर करण्यात आली आहे. माणसांसाठी ही ट्रिटमेंट किती सुरक्षित आणि प्रभावी ठरेल माहिती नाही. शिवाय हे औषध बाजारात यायलाही वेळ लागेल. रिपोर्टनुसार 2023 पर्यंत हे औषध उपलब्ध होऊ शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या