JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Lose Belly Fat : प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, पोटाचा घेरही होईल कमी

Lose Belly Fat : प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, पोटाचा घेरही होईल कमी

आहारातील योग्य बदलांमुळेही वजन आटोक्यात ठेवता येऊ शकतं. खाण्यासंदर्भातील काही सोपे उपाय करून प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करता येऊ शकतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 सप्टेंबर :  गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात. जसजशी बाळाची वाढ होते, तसा पोटाचा घेर वाढतो व वजनही वाढू लागतं. प्रसूतीनंतर वाढलेलं वजन लगेचच कमी होत नाही. काही वेळेला कंबरही पूर्ववत होत नाही. अनेक स्त्रियांना प्रसूतीनंतरच्या वाढलेल्या वजनामुळे आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. प्रसूतीनंतर जास्तीतजास्त वेळ बाळासाठी व घरच्यांसाठी दिला जातो. स्त्रियांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळेही अनेक महिने उलटूनही पोटाचा घेर व वजन कमी होत  नाही. त्याची चिंता करण्यापेक्षा काही सोप्या टिप्स वापरून वजन नियंत्रणात आणता येऊ शकतं. एनडीटीव्ही इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे. वजन कमी करण्यात आहाराचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. आहारातील योग्य बदलांमुळेही वजन आटोक्यात ठेवता येऊ शकतं. खाण्यासंदर्भातील काही सोपे उपाय करून प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करता येऊ शकतं. तसंच पोटही कमी करता येऊ शकतं. ग्रीन टी वजन कमी करायचं असेल, तर साध्या चहापेक्षा ग्रीन टी प्या. यामुळे चरबी कमी करण्यासाठी मदत होते. सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेला ग्रीन टी (Green Tea) प्यावा. हवा असल्यास मध घालूनही ग्रीन टी पिता येऊ शकतो. कोमट पाणी आणि मध सकाळी उठल्यावर गरम पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं. मात्र वजन कमी करायचं असेल, तर कोमट पाण्यात थोडासा मध घालून प्यावं. यात लिंबाचा रस घातला तरी चालतो. यामुळे शरीर डिटॉक्स होतं. चयापचयाची क्रिया सुधारण्यासाठीही याचा फायदा होतो. हेही वाचा - Benefits of Tea : भरपूर चहा प्या आणि मृत्यूचा धोका कमी करा; वाचा फायदे दालचिनीचं पाणी पोट कमी करण्यासाठी दालचिनीचं पाणी उपयुक्त ठरतं. अर्धा चमचा दालचिनी पावडर गरम पाण्यात घालून ते उकळून, गाळून घ्या. सकाळी नाश्त्याच्या आधी हे पाणी प्या. मेथीच्या दाण्यांचं पाणी मेथीचे दाणे (Fenugreek Seeds) अनेक आजारांवर गुणकारी आहेत. एक ते दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी गाळून प्यावं. पोट कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. कढीपत्ता आयुर्वेदात कढीपत्त्याला (Curry Leaves) औषधासमान मानलं गेलं आहे. वजन कमी करण्यासोबतच पोट कमी करण्यासाठी याचा विशेष उपयोग होतो. त्यासाठी रोज काही कढीपत्त्याची पानं चावून खावी किंवा या पानांचं पाणीदेखील पिता येऊ शकतं.

क्रॅश डाएट टाळा वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट (Avoid Crash Diet) म्हणजे एकाचवेळी भरपूर खाणं टाळलं पाहिजे. वजन कमी करताना आहारावर लक्ष देणं जरूरी असतं. आहाराच्या योग्य सवयींमुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. हे घरगुती उपाय प्रसूतीनंतरच्या काही महिन्यांत वाढलेलं वजन व पोटाचा घेर कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या