JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / एलॉन मस्क वजन नियंत्रणासाठी घेतात ‘हे’ औषध; नेमकं या औषधीत असं विशेष काय?

एलॉन मस्क वजन नियंत्रणासाठी घेतात ‘हे’ औषध; नेमकं या औषधीत असं विशेष काय?

खरं तर हे औषध डायबेटीसच्या रुग्णांसाठी वापरलं जातं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सध्याच्या धावपळीच्या जगात आहाराकडे दुर्लक्ष होतं. जेवणाच्या अनियमित वेळा आणि कामाचा ताण यामुळे तब्येतीवर परिणाम होतो. भूक लागल्यावर अनहायजीनिक गोष्टी खाल्ल्याने वजन वाढतं. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जण व्यायाम, योगासनं, धावणं आदी गोष्टी करतात; पण वजन नियंत्रणात राहण्यासाठी औषधदेखील आहे. टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क वजन नियंत्रणात राहण्यासाठी हे औषध घेतात. जाणून घेऊ या त्याबद्दलची अधिक माहिती. याविषयी माहिती देणारं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. जगातली सर्वांत श्रीमंत अशी एलॉन मस्क यांची ख्याती आहे. तसंच ते टेस्ला या नामवंत कंपनीचे सीईओ आहेत. नुकताच त्यांनी आपल्या फिटनेसच्या रहस्याचा खुलासा केला. ते म्हणाले, की ‘फिट राहण्यासाठी फास्टिंगसोबत ते विशिष्ट प्रकारचं औषधही घेतात.’ एलॉन मस्क 51 वर्षांचे आहेत. परंतु, ते आजही 30-32 वर्षांच्या तरुण दिसतात आणि असतात. त्यांचे चाहते ट्विटरवर त्यांच्या उत्तम फिटनेसबाबत नेहमीच विचारणा करतात. नुकतंच त्यांच्या एका फॉलोअरने विचारलं, की “तुम्ही खूपच रुबाबदार दिसता, तर तुम्ही वेट लिफ्टिंग आणि हेल्दी डाएट घेता का?” यावर मस्क म्हणाले, ‘फास्टिंग आणि वीगोवी नावाचं औषध.’ वीगोवी हे औषध केवळ दोन प्रकारच्या लोकांसाठीच आहे. एक म्हणजे जे अतिशय स्थूल आहेत आणि ज्यांचं वजन अतिलठ्ठतेच्या प्रमाणाच्या बाहेर आहे. तसंच अशा व्यक्ती, ज्या डायबेटीसच्या टाइप 2 प्रकारात मोडतात आणि ज्या हाय कोलेस्टेरॉलच्या समस्येला तोंड देत आहेत. यासाठी केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घेणं उपयुक्त ठरतं. व्हरायटी या अमेरिकन वेबसाइटच्या माहितीनुसार, अनेक सेलेब्रिटीज वजन कमी करण्यासाठी हे महागडं औषध घेतात. त्यामुळे आता या औषधाचा तुटवडा आहे. हे औषध महिनाभर घेतल्यास त्याची किंमत 1200 ते 1500 डॉलर इतकी आहे. अर्थात, भारतीय चलनाप्रमाणे त्याची किंमत तब्बल 98,000-1,23,000 रुपये इतकी होते. वजन कमी करण्यासाठी एफडीएने या औषधाचा उपयोग करायला परवानगी दिलीय. परंतु, त्यासोबत कमी कॅलरीज असलेलं हेल्दी डाएट आणि व्यायामाचा सल्लाही दिला जातो. या औषधाच्या वापरामुळे सुरुवातीला काही जणांना उलटी किंवा अतिसार (डायरिया) यांसारखे साइड इफेक्ट्स दिसतात; पण काही दिवसांनी हे बंद होतं. हेही वाचा - टे स्लाचे सीईओ एलॉन मस्क बनले सेल्समन! म्हणाले, ‘माझं परफ्यूम खरेदी करा, मला ट्विटर खरेदी करायचंय’ काय आहे हे वीगोवी औषध? अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने मागच्या वर्षी वीगोवी औषध हे वजन कमी करण्यास वापरण्यासाठी मान्यता दिली होती. खरं तर हे औषध डायबेटीसच्या रुग्णांसाठी वापरलं जातं. परंतु, आता हे औषध वजन नियंत्रणात राखण्यासाठी सर्रास वापरलं जातंय. वीगोवी हे औषध डेन्मार्कमधल्या नोवो नोर्डिस्क कंपनीचं आहे. याच कंपनीच्या सेमाग्लूटाइड औषधाची ही सुधारित आवृत्ती आहे. त्यामुळे भूक निर्माण करणारे हॉर्मोन्स नियंत्रणात राहतात. परिणामी, पचनप्रक्रिया मंदावते आणि बराच वेळ भूक लागत नाही. लठ्ठपणावर उपचार घेणार्‍या व्यक्तींला आठवड्यातून एकदा हे औषध टोचलं जातं. हे औषध 68 आठवड्यात जवळपास 15ते 20 टक्के वजन कमी करतं. या औषधाचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या