JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दात किडण्याच्या समस्येने त्रस्त आहात? 'हे' 4 घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

दात किडण्याच्या समस्येने त्रस्त आहात? 'हे' 4 घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

उत्तम आरोग्यासाठी दात निरोगी असणं गरजेचं आहे. दात किडणं ही समस्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला त्रास देते. दात खराब होणं किंवा किडण्यामागं अनेक कारणं असतात.

जाहिरात

फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑक्टोबर- उत्तम आरोग्यासाठी दात निरोगी असणं गरजेचं आहे. दात किडणं ही समस्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला त्रास देते. दात खराब होणं किंवा किडण्यामागं अनेक कारणं असतात. खरं तर दातदुखीमुळे जाणवणाऱ्या वेदना अत्यंत असह्य असतात. अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. त्यामुळे दात दुखू नये तसंच दाताशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. `एनडी टीव्ही`ने या विषयीची माहिती दिली आहे. दात किडण्यामागे अनेक कारणं असतात. सर्वसामान्यपणे मागच्या बाजूस असलेले दात लवकर किडू शकतात. तसंच दातदुखी, दात किडल्याने त्यात पोकळी निर्माण होणं, हिरड्यांमधून रक्त येणं आणि दात पिवळे पडणं या समस्या देखील जाणवू शकतात. असा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. पण घरगुती उपायांच्या माध्यमातून तुम्ही या समस्या पहिल्या टप्प्यात रोखू शकता. दात किडल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अंड्यापासून तयार होणारी एक पूड फायदेशीर ठरू शकते. ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम अंड्यावरील कवच स्वच्छ धुवून सुकवावे. त्यानंतर हे कवच बारीक करून त्याची पावडर बनवावी आणि त्यात बेकिंग सोडा घालावा. या मिश्रणाने दात स्वच्छ घासावे आणि काही वेळानंतर तोंड धुवून टाकावं. **(हे वाचा:** हवामान बदलामुळे आजार का वाढतात? ही आहेत कारणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती ) तोंडाचं आरोग्य राखण्यासाठी आणि दातातील पोकळी दूर करण्यासाठी लसणाचा वापर उपयुक्त ठरू शकतो. तुम्ही रोजच्या आहारात लसणाचा समावेश करू शकता. रोज रिकाम्यापोटी लसणाचं सेवन केल्यास फायदा होता. तसंच लसणाचे बारीक तुकडे करून ते कुटून पोकळी असलेल्या दातांवर ठेवल्यास ही समस्या दूर होऊ शकते. दिवसातून दोन ते तीन वेळा लवंग तेल चघळल्याने दातातील पोकळी दूर होण्यास मदत होते. लवंग तेलात अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे दाताची किड दूर होण्यास मदत होते. कापसाच्या बोळ्यावर लवंग तेलाचे थेंब टाकून तो कापूस खराब झालेल्या दातावर थेट ठेवल्यास आराम पडू शकतो.पेरुच्या पानांमध्ये अँटिमायक्रोबायल गुणधर्म असतात. यामुळे दातातील पोकळीची समस्या दूर होऊ शकते. या पानांचा वापर तुम्ही माउथवॉश म्हणूनही करू शकता. माउथवॉश तयार करण्यासाठी पेरुच्या पानांचे बारीक तुकडे करावे आणि हे तुकडे पाण्यात उकळून घ्यावेत. या पाण्याने तुम्ही गुळण्या करू शकता. अशा घरगुती उपायांमुळे दातांच्या समस्या दूर होऊ शकतात. पण दातांच्या समस्या वाढत असतील, तर डेन्टिस्टचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या