JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चेहऱ्यासाठी वापरा coconut milk face pack; त्वचा होईल Glowing

चेहऱ्यासाठी वापरा coconut milk face pack; त्वचा होईल Glowing

नारळाचं दूध आपली केसांबरोबर त्वचा तजेलदार (Skin Glowing) बनवण्यासाठी एकदातरी वापरून पाहा.याचा फेस पॅकही वापरता येऊ शकतो.

जाहिरात

ब्लीचिंगमुळे त्वचेवर हलके रॅसेस किंवा पुरळ उठलं असेल तर चेहऱ्यावर नारळाचं दूध किंवा नारळाचं पाणी वापरू शकता. यासाठी कॉटन पॅडमध्ये नारळ पाणी किंवा नारळाचं दूध घेऊन लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 जुलै**:** नारळ पाण्याचे फायदे (Benefits of Coconut Water) तर, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. नारळ पाण्याने शरारीराला फायदा (Health Benefits) होतो. शिवाय त्वचाही चांगली होते. तर, नारळाचं तेल केस आणि त्वचेसाठीही चांगलं असतं. नारळाचं तेल जेवणातंही (Cooking) वारतात. तसंच नाळच्या दुधाचा वापार चेहऱ्यासाठी करता येतो. याचा वापर फेस पॅकमध्ये (Face Pack) करून आपल्या त्वचेवर लावू शकतो. यामुळे त्वचा चमकदार होईल, डेड स्किन निघून जाईल, फ्रि रॉडिकल्सपासून संरक्षण होईल. पिंपल्स आणि डाग दूर होतील. पाहूयात नारळाच्या दुधाचा फेस पॅक कसा तयार केला जाऊ शकतो. त्वचा चमकदार होईल 5 बदाम रात्रीभर भिजत ठेवा. सकाळी बारीक वाटून पेस्ट करा. आता त्यात 2 चमचे नारळाचे दूध आणि अर्धा चमचा मध मिसळा तिन्ही चांगलं एकत्र करा. आता आपला गळा आणि चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर 2 ते 3 मिनीट मॉलिश करा. 20 मिनिटांसाठी तसंच ठेवा,त्यानंतर पाण्याने स्वच्छ धूवा.

तुम्ही भेसळयुक्त चहा तर पित नाही ना? ‘या’ पद्धताने ओळखा चहाची शुद्धता

संबंधित बातम्या

पिंपल्सपासून मुक्ती मुरुमांकरता फेस पॅक करताना 2 चमचे नारळाचे दूध घ्या, त्यात 1 चमचा गुलाब पाणी घाला. कापसाने हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. नंतर 2 मिनिटांसाठी हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर 10 मिनिटं चेहऱ्यावर राहू द्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. कोरडी त्वचा मऊ आणि चमकदार करण्यासाठी कोरडी त्वचा मऊ आणि चमकदार होण्यासाठी 2 चमचे नारळचं दूध, 1 चमचा दही मिसळून दाट पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर चांगली लावा आणि २ ते 3 मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. नंतर 15 मिनीटांनी चेहरा पाण्याने धुवा. महामार्गावर तरुणांची फिल्मी स्टाईल भाईगिरी पाहिलात का? बघा LIVE VIDEO स्किन एक्सफोलिएट करण्यसाठी दोन-तीन चमचे ओट्स बारीक वाटून घ्या. एका भांड्यात एक मोठा चमचा ओट्स घ्या आणि 3 ते 4 चमचे नारळाचं दूध मिसळून जाड पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा आणि त्यावर 5 ते 7 मिनिटं मॉलिश करा आणि 20 मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी फायदा होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या