मुंबई, 6 जुलै : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यं वेगवेगळी असतात. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव (Nature) नेमका कसा आहे, हे पट्कन समजणं तसं अवघड असतं. कुंडली, राशीवरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, तसंच त्याच्या जीवनात भविष्यात कोणत्या घटना घडू शकतात, हे ढोबळमानानं समजू शकतं. तसंच या गोष्टीवरून संबंधित व्यक्तीच्या मनातल्या गोष्टींचाही अंदाज बांधता येऊ शकतो, असं ज्योतिष शास्त्राचे (Jyotish shastra) जाणकार सांगतात. सामुद्रिक शास्त्रानुसार, व्यक्तीच्या चेहऱ्याची ठेवण, तीळ, डोळे, हस्तरेषा, शरीर रचनेवरून त्याचा स्वभाव, मानसिकता समजू शकते. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून (Face) त्याचा स्वभाव आणि गुणदोषांचा अंदाज घेता येऊ शकतो. लांब, गोलाकार, अंडाकृती चेहरा असलेल्या व्यक्तींची खास अशी स्वभाव वैशिष्ट्यं असतात. तसंच व्यक्तीच्या मनात कोणते विचार सुरू आहेत, हे त्याच्या चेहऱ्यावरून सहजपणे समजू शकतं. `इंडिया डॉट कॉम`ने या विषयीची माहिती दिली आहे. व्यक्तीचा चेहरा, शरीरावरचे तीळ, हात आणि बोटांची ठेवण, डोळे यावरून त्याचं व्यक्तिमत्त्व, स्वभाव, गुणदोष तसंच भविष्य जाणून घेता येऊ शकतं, असं सामुद्रिक शास्त्राचे (Palmistry) अभ्यासक सांगतात. गोल चेहरा (Round Face) असलेल्या व्यक्ती आनंदी स्वभावाच्या असतात. जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीत त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. या व्यक्तींना साहसाची विशेष आवड असते. या व्यक्तींना चेष्टा मस्करी करण्याची सवय असते. आनंदी स्वभावामुळे ते समोरील व्यक्तींना आकर्षित करतात. तुम्हीही भात शिजवण्यासाठी चुकीची पद्धत वापरता का? ही आहे योग्य पद्धत अंडाकृती चेहरा असलेल्या व्यक्ती कामुक असतात. नवे मित्र जोडणं या व्यक्तींना विशेष आवडतं. या व्यक्ती आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवतात आणि त्यांना बहुतांश वेळ जोडीदारासोबत घालवायला आवडतं. पातळ किंवा लहान चेहरा असलेल्या व्यक्ती चिडखोर स्वभावाच्या असतात. त्यांच्यामध्ये नकारात्मकता जास्त असते. या व्यक्तींना सडेतोड बोलणं विशेष आवडतं. मात्र कोणत्याही परिस्थितीत ते चिंताग्रस्त होतात. या व्यक्तींना स्वतंत्र राहणं आवडतं तसेच त्यांना कोणाचे आदेश ऐकायला बिल्कुल आवडत नाही, असं हस्तसामुद्रिक शास्त्राचे अभ्यासक सांगतात. हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, लांब चेहरा (Long Shape Face) असलेल्या व्यक्ती अन्य व्यक्तींच्या तुलनेत काहीशा वेगळ्या असतात. जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याकडे त्यांचा कल असतो. या व्यक्ती जीवनात यशस्वी होतात. तसंच त्या खूप रोमँटिक असतात. या व्यक्ती आपल्या बोलण्यानं समोरच्या व्यक्तीला सहज प्रभावित करू शकतात. एकूणच चेहऱ्याचा आकार आणि ठेवण यावरून त्याचा स्वभाव समजू शकतो. तसंच त्याच्या मनात नेमके कोणते विचार सुरू आहे, याचा अंदाज येऊ शकतो.