हल्ली प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेच वातावरण आहे. त्यासाठी सतत धावपळ, कामाचा ताण आदी गोष्टींचा सामना करावा लागतो. फिटनेसबाबत जागरूकता वाढली आहे.परंतु, व्यायमाचं आणि डाएटचे वेळापत्रक पाळलं जात नाही अशी अनेकांची स्थिती आहे. कामामुळे अनियमित जेवणाच्या वेळा, कामाचे वाढलेले तास, दगदग यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. अनेकांना लहान वयात विविध विकार होतात. डायबेटिस, हाय ब्लड प्रेशर यासारखे आजार बळावतात. आपण कधीही आणि काहीही खातो. त्यातच अनेकांना जेवणात खूप मीठ खाण्याची सवय असते. हाय ब्लडप्रेशर असणाऱ्यांनी मीठ हे प्रमाणातच खाणं आवश्यक असतं. डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन न करणं अंगाशी येऊ शकतं. जाणून घेऊयात या बद्दलची अधिक माहिती. ‘आज तक’ ने याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे. संतुलित आहार हा शरीरासाठी आवश्यक असतो. परंतु, काहीजणांना चमचमीत पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे घरगुती आहारापेक्षा रस्त्यावरचे पदार्थ काहींना फार आवडतात. हे पदार्थ रुचकर होण्यासाठी यात मीठ आणि इतर मसाले अधिक घातले जातात. कोणतेही विकार असलेल्या रुग्णांनी डाएट पाळणं आवश्यक असतं. अनेकजण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. अति मीठ खाणं शरीरासाठी अपायकारक - अति प्रमाणात मीठ सेवन केल्याने ब्लडप्रेशर, हायपर टेन्शन आणि हृदय विकारांना सुरूवात होते. दिवसाला केवळ 2 ग्रॅम मीठ खाणंच योग्य आहे. कारण कधीच पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. तब्येतीसाठी हे घातक ठरतं. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, हायपर टेन्शन असलेल्यांनी दिवसाला 1.5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ खाणं धोकादायक ठरतं. हेही वाचा - मुलीला अशा ठिकाणी आले केस की आई हादरली; डॉक्टरही म्हणाले, हा खतरनाक आजाराचा संकेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार, पाच ग्रॅम मिठात 2 ग्रॅम सोडियम असतं. कुठल्याही वयस्कर व्यक्तीने दिवसाला 2 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ खाणं टाळावं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार, दररोज आहारात 5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ खाणं घातक ठरतं. यामुळे हाय ब्लडप्रेशरचा त्रास वाढतो. कालांतराने, हृदयविकाराची समस्या निर्माण होऊ शकते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये एका संशोधनाविषयी माहिती प्रकाशित झाली होती. त्या संशोधनानुसार, प्रत्येक पदार्थात 3.8 ग्रॅम इतकं मीठाचं प्रमाण असतं. ज्यामुळे, जेवणानंतर रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. संशोधकांनी असंही म्हटलंय की, अतिमीठ खाल्ल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्त प्रवाहात अडथळा येतो. ही प्रक्रिया जेवणानंतर अर्ध्या तासाने सुरू होते ही गंभीर बाब आहे. जास्त मीठ खाणं शरीरासाठी उपकारक आहेच. त्यातून आपल्याला आयोडिन मिळतं. तसंच हे थायरॉइड ग्रंथीना रेग्युलेट करणं आणि बॉडीतील फ्लुईड्सचं प्रमाण संतुलित ठेवत. मीठ खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण मीठाचं सेवन हे मर्यादितच असावं. सुखी आणि निरोगी जीवनासाठी हीच गुरुकिल्ली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.