मुंबई, 28 जुलै : प्रेम (Love) ही एक सुंदर अशी भावना (Feeling) आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनात एकदा तरी प्रेमात पडतेच. प्रेमात पडल्यानंतर आपली भावना समोरच्या व्यक्तीसमोर कशी व्यक्ती करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी मनात असते ती फक्त भीती आणि संभ्रम. आजच्या काळात प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. प्रेम व्यक्त करण्याचा क्षण दोघांच्याही कायम स्मरणात राहावा यासाठी काही तरी हटके करण्याचाही काही जण प्रयत्न करतात. काही जण प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअॅप (Whatsapp) किंवा अन्य मेसेजिंग अॅप्सचा (Messaging App) आधार घेतात. यामुळे प्रेम व्यक्त करणं सोपं जात असलं तरी त्या क्षणाची लिखित स्वरूपात आठवण कायमस्वरूपी आपल्या जवळ राहत नाही. त्यामुळे प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी टेक्नोलॉजीचा वापर करण्यापेक्षा पारंपरिक कागद-पेनाचा (Paper And Pen) वापर करावा, असं सांगितलं जातं. प्रेमाची भावना कागदावर व्यक्त करण्याचे अनेक फायदे आहेत. `एबीपी लाइव्ह`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. प्रेम ही सर्वांत खास अशी भावना असते. एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडल्यानंतर ते व्यक्त करणं अनेकांना काहीसं अवघड जातं. अगदी सोप्या पद्धतीनं प्रेम व्यक्त करण्यासाठी मेसेजिंग अॅप्सचा वापर केला जातो. यामुळे तो क्षण साजरा होतो; पण मेसेज कायमस्वरूपी राहत नाही. डिलीट झाल्याने किंवा अन्य काही कारणाने हा मेसेज आपल्याला परत सापडतोच असं नाही. त्यामुळे कागदावर मेसेज लिहून खास व्यक्तीकडे आपलं प्रेम व्यक्त करणं केव्हाही चांगलं ठरतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट कागदावर लिहितो तेव्हा त्या गोष्टीची जाणीव आपलं मन (Mind) आणि मेंदूला (Brain) असते. त्यामुळे बोलून किंवा मेसेज करून नाही, तर कागदावर लिहून प्रेम व्यक्त करावं. लेखन (Writing) आणि वाचनाचा प्रभाव आपल्या मेंदूवर दीर्घ काळ राहतो. त्यामुळे तुम्ही प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल, तर मनातली भावना लिहून व्यक्त करावी. No Makeup Look : सध्या ट्रेंडमध्ये असलेला नो मेकअप लूक म्हणजे काय? यासाठी कोणते स्किन प्रोडक्ट वापरावे? प्रेमाविषयी लिहिताना तुम्ही तुमचा प्रियकर किंवा प्रेयसीविषयी विचार करता. यामुळे चांगल्या क्षणांच्या आठवणी ताज्या होतात. त्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने आपली भावना लिहू शकता. जेव्हा तुम्ही तुमचा प्रियकर किंवा प्रेयसीकडे प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी लिहू लागता, तेव्हा तुमच्या डोक्यात अनेक गोष्टी असतात. या सर्व गोष्टी तुम्ही बोलून किंवा मेसेजच्या माध्यमातून व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे प्रेमाची भावना कागदावर उतरवणं केव्हाही चांगलं ठरतं. जेव्हा तुम्ही तुमची प्रेम भावना कागदावर उतरवू लागता, तेव्हा तुम्ही तुमचा प्रियकर किंवा प्रेयसीविषयी विचार करू लागता. यामुळे त्या खास व्यक्तीशी निगडित क्षण तुमच्या डोळ्यासमोर येतात. अशा वेळी प्रेमाविषयी लिहिणं सोपं जातं आणि नेमक्या भावना कागदावर उतरतात. घरातील कात्रीची धार कमी झाली असेल तर हे उपाय करा; परत नव्यासारखी होईल तीक्ष्ण पूर्वीच्या काळी कबुतरामार्फत (Pigeon) प्रेमाचा संदेश (Love Message) पाठवला जायचा. हा अनुभव खूपच रोमांचक असायचा. नंतरच्या काळात पत्राच्या माध्यमातून प्रेमभावना संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या जायच्या. हे पत्र तो किंवा ती वारंवार लपून वाचत असे. यामुळे प्रेमाची सुंदर भावना मनात दीर्घ काळ कायम राहत असे. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी भावना कागदावर लिहाव्यात आणि ते पत्र प्रियकर किंवा प्रेयसीपर्यंत पोहोचवावं, हे आजच्या काळातही प्रभावी ठरू शकेल.