JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रेरणादायी! सोलापूरच्या विडी कामगार महिलेनं सुरू केलं 'हाऊस ऑफ पराठा' Video

प्रेरणादायी! सोलापूरच्या विडी कामगार महिलेनं सुरू केलं 'हाऊस ऑफ पराठा' Video

Solapur : एकेकाळी विडी कामगार असलेल्या अनुराधा सोमा यांनी सोलापुरात स्वत:चं पराठा हाऊस सुरू केलंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

loसोलापूर, 31 डिसेंबर : पराठे हा पदार्थ उत्तर भारतामध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातही तो अगदी आवडीनं खाल्ला जातो. राज्यातील वेगवेगळ्या शहरातील हॉटेलमध्ये उत्तम पराठे मिळतात. सोलापुरातील ‘हाऊस ऑफ पराठा’ मध्ये 40 ते 50 प्रकारचे पराठे मिळतात. एकेकाळी विडी कामगार असलेल्या अनुराधा सोमा यांनी हे पराठा हाऊस सुरू केलंय. विडी कामगार ते पराठा हाऊसच्या मालकीन असा मोठा प्रेरणादायी त्यांचा  प्रवास आहे. कशी झाली सुरूवात? अनुराधा या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मेसचे डबे पुरवत असत. या विद्यार्थ्यांना चांगल्या चवीसोबतच पोष्टिक आहार मिळावा यासाठी त्या डब्यात रोज वेगळे पदार्थ देण्याचा प्रयत्न करत. यामधूनच त्यांनी वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून पराठे बनवले. पाककलेची आवड असल्यानं त्यांनी रोज नव्या भाज्या वापरुन मिक्स पराठे बनवण्यास सुरूवात केली. खायला रुचकर आणि चवीला खमंग असणारे हे पराठे लवकरच हिट झाले. एका घटनेमुळे कलाटणी गेल्या 10 वर्षांपासून अनुराधा हा व्यवसाय करत आहेत.  सोलापूरमध्ये 2012 साली झालेल्या फुड फेस्टिव्हलमध्ये त्यांनी परठे बनवले. हे पराठे खाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. खवय्यांनी अक्षरश: रांगा लावल्या. त्याचवेळी आपण हा पूर्णवेळ व्यवसाय केला पाहिजे असं अनुराधा यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ‘हाऊस ऑफ पराठा’ ची सुरूवात केली. पौष्टिक आणि रूचकर असे पराठे इथं मिळतात. सोलापूरची जगप्रसिद्ध शेंगदाणा चटणी कशी बनवतात? पाहा Video कसे बनवतात पराठे? अनुराधा यांनी त्यांची पराठे बनवण्याची पद्धत यावेळी सांगितली आहे. - सुरुवातीला पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. त्याला तेल लावून त्याचे उंडे बनवून घ्यावे. -बटाट्याचा पराठा करताना सुरूवातीला बटाटा उकडून घ्यावा, त्यानंतर त्यामध्ये मिरची, लसूण अद्रकची पेस्ट, हळद ,गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून ते एकजीव करून घ्यावे. -मळलेल्या पिठाच्या उंड्याचा खोलगट भाग करून त्यामध्ये ते स्टफिंग भरून घ्यावेत. - त्यानंतर तव्यामध्ये बटर टाकून ते भाजून घ्यावेत. - याप्रकारे ज्या भाज्यांचे पराठे बनवायचे आहेत त्याची स्टफिंग बनवून हीच पद्धत वापरावी.

सोलापुरकरांना आवडेल अशा पद्धतीनं पौष्टिक पदार्थ बनवण्याकडे माझा कल असतो. पारंपारिक पदार्थांना नव्या पद्धतीचा वापर करीत उत्तम क्वालिटी राखत हे पराठे मी बनवले आहेत. आमच्या प्रामाणिकतेमुळेच आज आमच्या या ‘हाऊस ऑफ पराठा’ या हॉटेलला अनेक जण फ्रॅंचायजी देण्याची मागणी करीत आहेत, अशी माहिती अनुराधा यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या