नवी दिल्ली, 18 मार्च : कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. आयुष्य जगतात कधी कठीण प्रसंग येतात, त्यावेळी न डगमगता त्यातून बाहेर पडणं गरजेचं असतं. वाईट काळात संयम आणि आत्मविश्वास कधी गमावू नये. हे दोन गुण कठीण परिस्थितीत तुमचे खरे मित्र ठरतात आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत (Chanakya Niti tips) करतात. टीव्ही 9 ने दिलेल्या बातमीनुसार, निरोगी शरीर (Health) हे आपलं पहिलं सुख असलं पाहिजे, आचार्यांचाही यावर विश्वास होता. आचार्य चाणक्यच्या मते, तुमच्या शरीराची सर्वात जास्त काळजी घ्या, ते निरोगी असेल तरच तुम्ही कोणतीही कामं करू शकता. तेच नीट नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहा. आयुष्यातील आपली सर्वात महत्त्वाची गुपितं कधीही कोणाला सांगू नका. कारण तुमचा आज जो मित्र आहे तो उद्या तुमचा मित्र राहील की नाही हे तुम्हाला माहीत नसते. अशा व्यक्तीशी तुमचे वैर झाले तर तो समाजात तुमची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. हे वाचा - चालण्याचा व्यायाम करताना अनेकांकडून ही चूक होते; फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक दुष्ट माणसाची प्रवृत्ती नेहमी धूर्त असते, त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक करू नका. त्यांनी कोणाची सेवा केली तरी त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. ते कधीही कोणाचे सगे-सोयरे असू शकत नाहीत. हे वाचा - तुम्हाला माहीत आहे का? वयानुसार महिला आणि पुरुषांमध्ये Blood Pressure किती असावं तुमची काही ध्येय असतील तर ती कोणालाच सांगू नका. ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि पूर्ण झोकून त्यासाठी काम कराय लागा. त्याविषयी सर्व माहिती मिळवा, काम करत रहा पण तुमचा हेतू उघड करू नका. तुमचे यश स्वतःच लोकांना तुमच्या ध्येयाबद्दल माहिती देईल. पण, जर तुम्ही ते एखाद्यासोबत अगोदर शेअर केले तर त्यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतो किंवा तुमच्या अपयशाची थट्टा करू शकतो. (सूचना : येथे दिलेली माहिती चाणक्यनीतीशी संबंधित माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)