JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / झोप नाही तर अँटिबॉडीज नाहीत; लस घेतल्याचाही नाही होणार फायदा

झोप नाही तर अँटिबॉडीज नाहीत; लस घेतल्याचाही नाही होणार फायदा

Corona Vaccination Effect: शरीराला पुरेशी झोप मिळत नसेल तर केवळ रोगाशी लढण्याची त्याची क्षमताच क्षीण होत नाही, तर कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी आपण घेतलेल्या लसीचा (Vaccine) प्रभावदेखील यामुळे कमी होतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 जुलै:  कोरोना विषाणूच्या साथीमुळे (Corona Pandemic) रोग प्रतिकारशक्तीचं (Immunity) महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. कोणत्याही संसर्गाला तोंड देण्यासाठी आपली रोग प्रतिकारशक्ती उत्तम असणं गरजेचं आहे. यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. लोक वेगवेगळ्या पद्धतीचा आहार (Diet), निरनिराळी औषधं घेत आहेत. पण रोगप्रतिकारक शक्तीचा थेट संबंध आपल्या झोपेशी (Sleep) असतो.  याबाबत मात्र लोक अनभिज्ञ आहेत. शरीराला पुरेशी झोप मिळत नसेल तर केवळ रोगाशी लढण्याची त्याची क्षमताच क्षीण होत नाही, तर कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी आपण घेतलेल्या लसीचा (Vaccine) प्रभावदेखील यामुळे कमी होतो. झोपेचा आरोग्याशी असलेला संबंध: उत्तम आरोग्यासाठी आहाराप्रमाणे झोपही महत्त्वाची आहे, असं संशोधकांचं मत आहे. मात्र लोक नेहमीच झोपेकडे दुर्लक्ष करतात. बीबीसी सायन्स फोकस नावाच्या मासिकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. आपल्या शरीराचा आणि मेंदूचा कोणताही भाग असा नाही ज्याचा झोपेशी संबंध नाही, असं कॅलिफोर्निया विद्यापीठातील न्यूरोसायन्सचे प्रोफेसर डॉ. मॅथ्यू वॉकर यांनी स्पष्ट केलं आहे. चांगली गाढ झोप संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारते, तर अपुऱ्या झोपेचा थेट परिणाम बाह्य आरोग्याबरोबरच आपल्या विचार आणि आकलन क्षमतेवरही परिणाम करते, असं त्यांनी नमूद केलं आहे. साथीच्या काळात झोपेच्या तक्रारींमध्ये वाढ: कोरोना साथीच्या काळात लोकांच्या झोपेवर वाईट परिणाम होत असल्याचं दिसत आहे. बिग थिंकमधील एका अहवालात, झोप आणि आरोग्य यांचा संबंध उलगडणाऱ्या एका अभ्यासाचा उल्लेख करण्यात आला आहे. यूकेमध्ये केलेल्या या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, लॉकडाउन (Lockdown) दरम्यान 35 ते 44 वर्षे वयोगटातील सुमारे 36 टक्के लोकांनी झोप येत नसल्याची तक्रार केली. हेही वाचा-  स्तनपानातील अडचणी होतील दूर; ‘लॅक्टेशन मसाज’ आईसाठी आहे फायदेशीर अपुऱ्या झोपेचे परिणाम : आवश्यकतेपेक्षा कमी झोप घेतल्यानं आरोग्यावर किती वाईट परिणाम होतात याची एक यादीच आहे. उदाहरणार्थ, हृदयविकाराचा झटका आलेल्या 24 टक्के प्रकरणांमध्ये असं निदर्शनास आलं आहे की, त्या आधीच्या रात्री त्या रुग्णाला नीट झोप लागली नव्हती. अपुऱ्या झोपेमुळे पुरुषांमध्ये नपुंसकतेचे प्रमाण वाढतं. हे प्रमाण इतकं गंभीर असतं की त्या व्यक्तीची दहा वर्षांनंतरच्या वयात घटणारी क्षमता आधीच घटते. त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर तुम्ही योग्य झोप घेत नसाल तर अँटीबॉडीजच्या(Antibodies) निर्मितीवर 50 टक्के परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे वृद्धावस्थेत अल्झायमरची शक्यतादेखील वाढते. जगातील 5 कोटींहून अधिक लोक अल्झायमरचा सामना करत आहेत, 2050 पर्यंत ही संख्या 152 दशलक्ष होईल. अपुऱ्या झोपेचा प्रतिकारशक्तीवर होणारा परिणाम : कार्नेजी मेलॉन विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात अपुऱ्या झोपेचा प्रतिकारशक्तीवर होणाऱ्या परिणामाबाबत अभ्यास करण्यात आला. त्यात असं आढळलं आहे की, तुम्हाला पुरेशी झोप येत नसेल तर तुम्हाला वारंवार सर्दी आणि ताप असे आजार होतात. तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याचं हे लक्षण आहे. हेही वाचा-  तुमचं बाळ अजूनही बोलत नाही? Tongue Tie असू शकतं कारण अभ्यास कसा झाला? या अभ्यासात 21 ते 55 वर्षे दरम्यान वय असलेल्या 153 निरोगी लोकांचा समावेश होता. त्यांना विलगीकरणात ठेवून त्यांच्या नाकात सर्दीचा विषाणू सोडण्यात आला. जे लोक 7 तासांपेक्षा कमी झोप घेत होते त्यांना या विषाणूची लागण झाली, तर जे लोक दररोज 8 तास झोप घेत होते त्यांच्यावर त्या विषाणूचा काहीच परिणाम झाला नसल्याचं आढळून आलं. शांत झोप कशी घ्यावी ? पूर्ण, शांत झोप म्हणजे रात्रीच्या वेळी सुमारे 8 तास झोप. जवळजवळ सर्व प्रौढांना याची आवश्यकता असते, परंतु आजारपणात अधिक झोपेची गरज असते. दररोज 8 तास शांत, गाढ झोप येण्यासाठी अनेक उपाय आहेत. रात्रीचे जेवण आणि झोपेच्या दरम्यान 3 तासांचं अंतर असणं आवश्यक आहे. तसंच हलक्या व्यायामानंही गाढ झोप येण्यास मदत होते. अनेक लोक रात्री शांत झोप लागावी यासाठी संगीतदेखील ऐकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या