JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हीच ठरवा नवऱ्याने घरात मदत करावी का? या संशोधनाने बायकोच्या अपेक्षेला जातील तडे

तुम्हीच ठरवा नवऱ्याने घरात मदत करावी का? या संशोधनाने बायकोच्या अपेक्षेला जातील तडे

महिला कामावरून घरी आल्या की पदर खोचून घरकामाला लागतात. त्यामुळे आपल्या जोडीदाराने (Life partner) घरातल्या कामांमध्ये किमान मदत करावी अशी अपेक्षा (Wife Expectation) असते. त्यात चूक काहीच नाही, पण हे काय आता नवं संशोधन?

जाहिरात

पती घरकामात मदत करण्यापेक्षा आपला वेळ पैसे कमावण्यात घालवातात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जून : नोकरी सांभाळून घरकाम करणं (Household Work) म्हणजे महिलांसाठी तारेवरची कसरत असते. नोकरीची दगदग (Job Tension)****, कुटूंबाची जबाबदारी, घरातली कामं, मुलं यांचा जास्तीजास्त भार महिलांवर पडतो. या सगळ्यात त्यांना स्वत:साठी वेळच उरत नाही. याउलट पुरूष केवळ नोकरी करतात. घरी परतल्यावर किंवा घरामधून बाहेर पडताना त्यांच्या डोक्यात केवळ ऑफिसच्या कामाचेच (Office Work) विचार असता. तर, महिला घरी आल्या की पदर खोचून पुन्हा कामाला लागतात. पूर्वीपेक्षा आताचा काळ बदलला आहे. त्यामुळे महिलांनाही आपल्या जोडीदाराने (Life partner) घरातल्या कामांमध्ये मदत करावी अशी अपेक्षा **(Wife Expectation)**असते. हल्ली काही पुरूष पत्नीला घरातल्या कामांमध्ये मदत करतातही. पण, फारच कमी कुटूंबामध्ये हा बदल दिसतो आहे. ( तणावामुळे हैराण आहात? ‘या’ 5 नैसर्गिक वस्तू Stress करतील दूर; औषधाची गरज नाही ) पण, आता जी माहिती तुम्ही वाचाणार आहात त्यावरून तुम्हीच ठरवा की पतीची घरकामात मदत हवी आहे की, त्याने जास्तीतजास्त पगार कमवावा असं वाटतं.बांग्लादेश मधील कॅथलिक विद्यापीठ नोत्र डॅमने (Notre Dame University) या संदर्भात एक संशोधन (Research) केलं आहे. ज्यानुसार पत्नीला घरकामात मदत न करणारे पती जास्त कामाई करतात. असा दावा करण्यात आला आहे. ( फक्त उपवासालाच नाही रोज खा शिंगाडे; होतील आरोग्याला अनेक फायदे ) या दाव्यानुसार पत्नीला घरकामात मदत न करणारे पती जास्त आर्थिक कमाई करतात. उलट पत्नीला घरातल्या कामात मदत करणाऱ्या पतींची कमाई कमी असल्याचं सांगण्यात आलंय. याकरता विद्यापिठाने पत्नीशी सहमत असलेले आणि नसलेले अशा 2 गटातल्या लोकांचा अभ्यास केला.   पत्नीच्या अपेक्षेशी सहमत नसणारे पती थोड्याफार प्रमाणात कामात मदत करतात किंवा मदतच करत नाहीत. ( लैंगिक समस्यांमुळे निराश होऊ नका; 9 Superfood वाढवतील तुमची सेक्स पॉवर ) संशोधनानुसार पतीच्या मताशी सहमत नसलेले पती घरकामात मदत करण्यापेक्षा आपला वेळ पैसे कमावण्यात घालवातात. मानसशास्त्रानुसार मानवात पाच महत्वाचे गुण असतात. त्यातला सहमती हा एक गुण आहे. त्याउलट सहमत न होणं हा एक गुण आहे. अशी माणसं स्वत:पुरता विचार करतात. पत्नीला मदत करण्यापेक्षा नोकरी कामधंद्याकडे लक्ष देतात. त्यामुळे जास्त कमावतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या