JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पालकांनो मुलांना Lollipop देताय सावधान! आधी ही बातमी जरूर वाचा

पालकांनो मुलांना Lollipop देताय सावधान! आधी ही बातमी जरूर वाचा

लॉलिपॉप खाताच मुलाचा जीव जाता जाता राहिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 09 मे : लॉलिपॉप, चॉकलेट, टॉफी खायला कुणाला आवडत नाही. पण काही वेळा हे पदार्थ जीवावरही बेतू शकतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एका मुलाचा लॉलिपॉपमुळे जीव जाता जाता राहिला आहे. तुमच्याही चिमुकल्यांना लॉलिपॉप देताना आधी ही बातमी जरूर वाचा. पालकांसाठी महत्त्वाची अशी ही बातमी आहे (Boy Nearly Dies After Lollipop Stuck in Throat). एमी मँटल नावाच्या महिलेने आपला मुलगा बेकनसोबत घडलेल्या दुर्घटना सांगून इतर पालकांना सावध केलं आहे. लॉलिपॉपच्या भयंकर दुष्परिणामाबाबत तिने पालकांना जागरूक केलं आहे. बेकन आपल्या आईसोबत हेअरकट करायला केला. तिथं हेअरस्टालिस्ट जेम्मा फेअरहर्स्टने त्याला लॉलिपॉप खायला दिलं. खाता खाता लॉलिपॉप त्याच्या घशात अडकलं. हळूहळू परिस्थिती खूपच गंभीर झाली. अखेर हेअरड्रेसरने मुलाला उलटं केलं. त्याचं डोकं खाली आणि पाय वर केले त्यानंतर त्याच्या पाठीवर मारत राहिली. तिच्या या ट्रिकने काम केलं आणि सुदैवाने मुलाचा जीव वाचला. हे वाचा -  Alert! Coronavirus नंतर आता Monkeypox virus चं संकट! या लक्षणांकडे दुर्लक्ष पडेल महागात द मिररच्या यूकेच्या रिपोर्टनुसार एमी म्हणाली, हे खूप भयानक अनुभव होता. सुरुवातीला मुलगा जेव्हा आपले खांदे उडवू लागले तेव्हा आम्हाला मजा वाटू लागली पण नंतर त्याला श्वास घ्यायला जमत नसल्याचं समजलं. कसंबसं मुलाच्या घशातून लॉलिपॉप बाहेर आलं आणि तो जोरजोरात रडू लागला. एमीने इतर पालकांना आपल्या मुलांना अशा घटनांपासून बचाव करा, असं आवाहन केलं आहे. तसंच लॉलिपॉपवर बॅन लावावा अशी मागणीही तिने केली आहे. लॉलिपॉपमुळे जीभ पोळली दरम्यान याआधी लॉलिपॉपमुळे चिमुकल्यांची जीभ पोळल्याची प्रकरणंही समोर आली आहेत. यूकेतील या मुलाचा एका खास चवीचं लॉलिपॉप खायला आवडत होतं. या लॉलिपॉपने त्याची जीभ पोळून काढली. सेफ्टी आणि फर्स्ट अॅड सर्व्हिस सीपीआर किड्सने याचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात मुलाची जीभ भाजलेली दिसते. त्याची जीभ भाजण्याचं कारण म्हणजे लॉलिपॉपमध्ये असलेलं हाय अॅसिडिक घटक. हे वाचा -  Mango Eating Mistakes: आंबे खाल्ल्यानंतर चुकून पण खायच्या नसतात या 5 गोष्टी, त्रास सुरू होतात मिरर यूके च्या रिपोर्टनुसार सीपीआर किड्सने कंपनीचं नाव सांगितलं नाही, पण मुलाने जे लॉलिपॉप खाल्लं त्याच्या दुष्परिणामांबाबत सांगितलं. 4 पेक्षा कमी वयाच्या मुलांना आंबट-गोड कँडी देऊ नये. अशा लॉलिपॉपमुळे त्यांची जीभ आणि तोंडाला त्रास होऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या