JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्ही चहा बनवताना या चुका करताय का? ही आहे Perfect Tea बनवण्याची योग्य पद्धत

तुम्ही चहा बनवताना या चुका करताय का? ही आहे Perfect Tea बनवण्याची योग्य पद्धत

आपल्याकडे असं म्हटलं जातं, की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा (Tea) लागतो. कारण अनेकांना चहाशिवाय चैन पडत नाही. मात्र तुम्ही योग्य पद्धतीने चहा बनवताय का?

जाहिरात

दिवसभर आपण काय खातो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. काही लोकांना चहा,कॉफी, मद्यपान करण्याची सवय असते

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आपल्याकडे असं म्हटलं जातं, की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा (Tea) लागतो. कारण अनेकांना चहाशिवाय चैन पडत नाही. काही जण आळस घालवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी आवर्जून चहा पितात. तसंच बरेच जण दिवसाची सुरुवात चहाने करतात. दिवसाची सुरुवात चहाने केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असाही काहींचा समज असतो; मात्र हाच चहा सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं चहा बनवतो. त्यामुळे चहाची चवसुद्धा वेगवेगळी असते. चहात केवळ चार गोष्टी वापरल्या जातात. प्रत्येक जण आवडीनुसार वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून चहा तयार करत असल्याने चव वेगवेगळी लागते. कोणी साखर वापरून, तर कोणी गुळाचा वापर करून चहा बनवतो. तसंच यामध्ये दूध टाकून किंवा बिनदुधाचाही चहा बनवला जातो. आपल्या, तसंच मित्र किंवा नातेवाईकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवला जातो; पण चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती, तो कसा बनवायचा याचा कधी विचार केला आहे का? आम्ही तुम्हाला चहा बनवण्याची ‘एक’ खास पद्धत सांगणार आहोत. हे वाचा- पावसात जिभेचे चोचले पुरवायचेत पण तोंड आल्याने हैराण; किचनमध्येच दडलेत सोपे उपाय चहा विविध प्रकारे तयार केला जातो. प्रत्येकाची चहा बनवण्याची एक खास पद्धत असते. तसंच प्रत्येकाची चहा उकळण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. ग्रीन टी (Green Tea), ब्लॅक टी (Black Tea), ओलॉन्ग टी, माचा टी, हर्बल टी (Herbal Tea), व्हाइट टी, ब्लेंड्स टी असे चहाचे विविध प्रकार आहेत. दूध किंवा दुधाशिवायही चहा बनविला जातो. बिनदुधाचा चहा आरोग्यास चांगला असतो; मात्र आपल्याकडे दुध घालून बनवलेला चहा सर्वांत जास्त प्रमाणात प्यायला जातो. चहा बनविताना चुकीची पद्धत वापरणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे चहाची चव बिघडते. बरेच जण आधी दूध उकळून मग त्यामध्ये पाणी, चहा पावडर घालतात. ही चुकीची पद्धत आहे. यात बराच वेळ दूध उकळावं लागतं. गॅस जास्त लागतो. सर्वांत शेवटी चहा पावडर घालणंही चुकीचीच पद्धत आहे. चहा चांगला उकळावा लागतो. तसं केलं, तर कमी चहा पावडर वापरूनही चहाला चांगली चव आणि गंध मिळतो. हे वाचा- ब्रेडचा ‘हा’ प्रकार असतो सगळ्यात हानिकारक, नेहमी खाल्ल्यास होईल किडनी फेल ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशनने (British Standard Institution) वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने चहा करण्याची पद्धत सांगितली आहे. या पद्धतीत एका भांड्यामध्ये फक्त दूध उकळवावं. चमच्याने ते ढवळत राहावं. दुसऱ्या भांड्यात चहासाठी पाणी गरम करायला ठेवावं. पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण एकसमान असावं. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये चहा पावडर घालावी. चहा पावडर साखरेच्या प्रमाणापेक्षा थोडी कमी असावी. त्यानंतर चहाला चांगली उकळी येऊ द्यावी. साखर चवीनुसार घालावी. त्यानंतर आवडीनुसार चहात आलं, लवंग, मिरपूड यांपैकी काही घालायचं असेल, घालू शकता. त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये उकळायला ठेवलेलं दूध चहामध्ये घालावं. त्यानंतर मात्र चहा जास्त वेळ उकळू नये. अशी ही चहा बनवण्याची खास पद्धत आहे. विशेष म्हणजे जुन्या शहरांमध्ये बरीच वर्षं चहा विकणारे मोठे विक्रेतेसुद्धा चहा बनवण्यासाठी हीच पद्धत वापरतात. ही पद्धत तुम्हीही नक्की वापरून पाहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या