जेनी जेरोम केरळ राज्यातली पहिल्या व्यावसायिक महिला पायलट बनल्या आहेत.
तिरुअनंतपुरम 24 मे : लहानपणी पाहिलेलं स्वप्न (Dream) पूर्ण झालं तर, कोणालाही आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटेल. पण, आकाशात उडण्याचं स्वप्न पूर्ण होत असेल तर, त्या आनंदाला सीमाच उरत नाहीत. काहीशी अशीच परिस्थिती झाली 23 वर्षांच्या जेनी जेरोम (Jeni Jerome) यांची. जेव्हा त्यांना कळालं की Air Arabia G9 449 साठी शारजा ते तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) उड्डाणासाठी को-पायलट (Co-pilot) म्हणून निवड झाली आहे. तिरुअनंतपुरममधील किनारपट्टीवर वसलेल्या अनेक खेड्यांपैकी एक असलेल्या कोचुथुरा **(Kochuthura)येथील मूळच्या रहिवासी असलेल्या जेनी सध्या आई-वडिलांसोबत अजमान(Ajman)**मध्ये राहतात. पण, लहानपाणापासूनच त्यांना उडण्याची आवड होती. त्यांचं हे स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आहे. या प्रवासात अनेकांनी त्यांची साथ दिली. ( कोरोनाग्रस्तांची मदत करायचीय? तर मग या उपक्रमात द्या प्रार्थना बेहरेची साथ ) केरळ (Kerala) राज्यात त्यांनी इतिहास रचला आहे. त्या राज्यातली पहिल्या व्यावसायिक महिला पायलट बनल्या आहेत. त्यामुळे जेनी यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सह-वैमानिकाची (co-pilot)भूमिका साकारण्यासाठी उड्डाणाची तयारी करता असताना जेनी यांना सोशल मीडियावरूनही प्रेम आणि पाठिंबा मिळाला. याची खरी सुरुवात कॉंग्रेसचे नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यामुळे झाली. त्यांनी जेनीला पहिल्या व्यावसायिक विमान उड्डाणासाठी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. खासदार शशी थरुर यांचं हे ट्वीट व्हायरल झाल्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. ( जनहित में जारी… नुसरत भरुचा मेडिकल स्टोअर्समध्ये विकणार कंडोम ) “कोचुथुराकडून सह-पायलट म्हणून पहिल्यांदा विमान उड्डाण करणाऱ्या जेनी जेरोम याचं अभिनंदन. आज त्या @aiararabiagroup फ्लाइट SHJ ते TRV उडवणार आहे, एका लहानशा मच्छिमारांच्या खेड्यातून आलेल्या एक मुलीचं व्यावसायिक पायलट होण्याचं बालपणीचं स्वप्न आज साकार झालं. त्यांची कहाणी खरंच प्रेरणादायी आहे!” अशा शब्दात थरूर यांनी जेनी यांचं कोतुक केलं आहे.
“जेनीला नेहमीच उडायला आवडायचं. तिचं हे लहानपणीचं स्वप्न होतं. खरं तर, या प्रवासात तिच्या वडिलांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी देखील तिच्या या स्वप्नात तिची साथ दिली”. असं त्यांची चुलत बहीण शेरीन यांनी दी न्यू इंडियन एक्सप्रेस बरोबर बोलताना म्हटलं आहे. जेनी यांनी शनिवारी पहिलं उड्डाण केलं. जेनी यांचे वडील जेरोम लॅम्परेल या ब्रिटीश कंपनीत फॅब्रिकेशन मॅनेजर म्हणून काम करतात. आईवडील आणि भाऊ हे तिचं कुटुंब आहे. तिचा भाऊ जेबी गेल्या 25 वर्षांपासून अजमान इथे स्थायिक झाला आहे. तर, जेनी यांनी बारावीच्या परीक्षेनंतर एव्हिएशन अकॅडमी जॉईन केली.