सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी फिटनेसच सांगितलं आहे.
नवी दिल्ली, 22 जून : संपूर्ण जगाने योगाचं महत्व (Important of Yoga) ओळखलेलं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटीसुद्धा आपल्या दिवसाची सुरुवात योगासनांनी करतात. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Celebrity **Nutritionist Rujuta Divekar)** वर्काऊट,आहार याचं महत्व सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सांगत असतात. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी (International Yoga Day) आपल्या फॉलोअर्सला योगासनं शिकवण्यासाठी एक व्हीडिओ **(Video)**तयार केला आहे. दरवर्षी 21 जूनला जागतिक योग दिन (World Yoga Day) साजरा केला जातो. ( International Yoga Day: साक्षात माधुरी दीक्षितबरोबर करा दररोज योगा; पाहा VIDEO ) कोरोनामुळे सध्या योग दिवस आपल्या घरातच साजरा करण्याची वेळ आली असली तरी,आपण घरातचं राहून काही सोपी योगासन करून हा दिवस साजरा करू शकतो असा संदेश त्यांनी दिला आहे. ( तुम्हालाही आहे हेअरबॅण्ड मनगटावर बांधायची सवय? होतील गंभीर परिणाम ) सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी फेसबुक आणि insta वरून दररोज कोणती आसनं करावीत हे सांगितलं आहे. त्यांनी दररोज करता येतील अशी 5 आसनं सांगितली आहेत.
गोमुखासन, पश्चिमोत्तासन, अधोमुखअश्वासनं, सुप्तपादअंगुष्टासन, विपरित करणी ही आसनं त्यांनी करायला सांगितली आहेत.