बँकॉक, 03 मे : मलेरिया म्हटलं की सर्वात आधी समोर येतात ते डास. हा आजार डासांमुळे पसरतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण आता डासांमुळे पसरणारा हा आजार माकडांमुळेही पसरू लागला आहे. त्यामुळे माकडांपासून दूर राहा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिलं आहे. पर्यटन ठिकाणी जिथं माकडं जास्त असतात अशा ठिकाणी गर्दी कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत (Monkeys spread malaria). डासांऐवजी माकडांपासून मलेरिया पसरण्याची प्रकरणं समोर आली आहे ती थायलंडमध्ये. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते मार्चदरम्यान अशी प्रकरणं वेगाने वाढत असल्याची दिसली. मार्चच्या अखेर प्लास्मोडियम नोलेसी जो मलेरियाचा एक प्रकार आहे, त्याचे एकूण 70 प्रकरणं समोर आल होती. त्याआधी पूर्ण वर्षात फक्त 10 प्रकरणांची नोंद झाली होती. याचा अर्थ आधीच्या तुलनेत मलेरियाची प्रकरणं वेगाने वाढत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे थायलँडमध्ये बाहेरहून येणाऱ्या लोकांना सावध करण्यात आलं आहे. हे वाचा - माकडाला त्रास देणं महिलेला भोवलं; प्राण्यानं केस ओढून मारहाण करत केली भयंकर अवस्था, VIDEO रोग नियंत्रण विभागाचे डॉ. ओपार्ट कर्णकाविनपोंग यांनी सांगितलं, हा खतरनाक पॅरासाइट ज्यामुळे ताप, थंडी लागणे, भूक न लागणं याशिवाय इतर लक्षणं दिसत आहेत, तो माणसांपासून माणसांमध्ये पसण्याचा धोका आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरी अशी लक्षणं दिसणाऱ्यांबाबत प्रशासन अलर्ट आहे. या लोकांना तात्काळ वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिथं मलेरियाग्रस्त माकडं आहेत, अशा जंगलांपासून दूर राहण्याच्या सूचना पोलिसांनी पर्यटकांना दिल्या आहेत. दक्षिणी प्रांत रानोंग, सोंगखला आणि ट्राटच्या पूर्व राज्यांतील माकडांना स्पर्श केला असेल किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्या संपर्कात आले असेल तर त्यांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार गरजेचे आहेत. हे वाचा - कटू वाटेल पण सत्य आहे! एवढ्याशा चिमुकल्याने सांगितली मोठी गोष्ट; प्रत्येक पालकाने पाहायलाच हवा हा VIDEO ज्यांना जास्त धोका आहे त्यांनी शरीर पूर्ण झाकलं जाईल असे कपडे घालण्याचा, मच्छरदाणीत झोपण्याचा आणि डास पळवण्याचे उपाय करण्यास सांगण्यात आलं आहे. कारण थोडासा निष्काळजीपणाही जीवावर बेतू शकतो.