JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दूध करपलंय? या सोप्या टिप्स वापरुन काही मिनिटात घालवा करपट वास

दूध करपलंय? या सोप्या टिप्स वापरुन काही मिनिटात घालवा करपट वास

दूध करपलं असेल आणि जळका, करपट वास येत असेल तर दालचिनीचा (Cinnamon) वापर करून हा वास घालवता येतो. तसंच तमालपत्र (Bay leaf) आणि वेलचीचाही (Cardamom) वापर करता येतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 08 मे : दूध (Milk) तापवायला ठेवलेलं असताना अगदी अर्धा-एक मिनिट आपण इकडे तिकडे गेलो की तेवढ्यातच ते दूध उतू जातं किंवा जास्त वेळ दुर्लक्ष झालं तर करपतं (Burnt). करपलेल्या दुधाला एक विशिष्ट असा करपट वास येतो. त्यामुळं ते दूध चहा, कॉफीसाठी किंवा खीर वगैरे पदार्थात घालणंही कठीण असतं. नुसतं पिण्यासाठी तर ते त्याहूनही नको वाटतं. त्याच्या वासामुळे ते पिणं शक्य नसतं. मात्र हे दूध टाकून द्यायचंही गृहिणींच्या जीवावर येत असतं. अशावेळी काही साध्या सोप्या गोष्टी करुन या दुधाचा करपट वास करता येतो आणि त्याचा वापर करणं शक्य होतं. जाणून घेऊया यासाठी काय करावं… दालचिनीचा वापर करा :  दूध करपलं असेल आणि जळका, करपट वास येत असेल तर दालचिनीचा (Cinnamon) वापर करून हा वास घालवता येतो. यासाठी करपलेल्या भांड्यातील दूध दुसऱ्या स्वच्छ भांड्यात ओता. त्यानंतर दुसर्‍या एका भांड्यात एक चमचा तूप घाला आणि गरम करा. गरम झाल्यावर त्यात दालचिनीचे काही तुकडे घाला. ते जरा परतल्यानंतर त्यात दूध घाला आणि ढवळत राहा. हळूहळू करपट वास कमी होईल. मग हे दूध तुम्ही वापरू शकाल. तरीही ते दूध चहा किंवा खीर यामध्ये वापरण्याची इच्छा होत नसेल तर पुरी किंवा पराठ्याचे पीठ मळण्यासाठी याचा उपयोग करता येईल किंवा ते आटवून तुम्ही बासुंदी, रबडी बनवू शकता किंवा त्यापासून पनीरही बनवू शकता. कोरोनातून लवकर बरं व्हायचं आहे; आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश तमालपत्र, वेलचीचा वापर : दुधाचा करपट वास दूर करण्यासाठी तमालपत्र (Bay leaf) आणि वेलचीचाही (Cardamom) वापर करता येतो. यासाठी प्रथम एका भांड्यात दोन चमचे तूप गरम करून त्यात वेलची आणि तमालपत्र घाला. यातच दालचिनीदेखील घालू शकता. आता त्यात दूध घाला आणि काही मिनिटे उकळवा. त्यात तुम्ही केशरदेखील घालू शकता. हळूहळू दुधाचा उग्र,जळका वास कमी होईल. चहा, खीर यामध्ये तुम्ही हे दुध वापरू शकता. या सगळ्या पदार्थांचा वापर केल्यानं हे दूध स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बनतं. खाण्याच्या (विड्याच्या) पानांचा वापर: विड्याच्या पानांचा (betel Leaf) वापर करूनदेखील आपण दुधाचा जळका वास घालवू शकतो. यासाठी करपलेले दूध दुसऱ्या एका स्वच्छ भांड्यात काढून घ्या आणि त्यात थोडी विड्याची पाने घाला. चार किंवा पाच पानं वापरण्यास हरकत नाही. अर्ध्या तासासाठी ही पाने दुधात घालून ठेवा. हळूहळू दुधाचा करपट वास कमी होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या