JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नात्यात दुरावा आला, हे कसं ओळखाल? तज्ज्ञांनी सांगितल्या महत्त्वपूर्ण गोष्टी

नात्यात दुरावा आला, हे कसं ओळखाल? तज्ज्ञांनी सांगितल्या महत्त्वपूर्ण गोष्टी

नात्यांमधला दुरावा शब्दांऐवजी जोडीदाराच्या वागण्यातून व्यक्त होत असतो. तो कसा ओळखाल?

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : लग्न टिकवण्यासाठी प्रेमाबरोबरच विश्वास महत्त्वाचा असतो. सुरुवातीच्या दिवसांमधलं आनंदी, उत्साही वातावरण संपल्यानंतर नात्याची खरी कसोटी सुरू होते. एकमेकांना आहे तसं स्वीकारलं नाही, तर अपेक्षाभंगाचं दुःख होतं आणि मग एकमेकांपासून दुरावण्याची भीती निर्माण होते. भावनिक नातं हळूहळू संपुष्टात येतं; मात्र बहुतेक वेळा हा दुरावा शब्दांमधून व्यक्त होत नाही. अशा वेळी जोडीदाराच्या मनातलं ओळखणं अवघड होतं. इथेच अनेक नातेसंबंध तुटण्याची शक्यता निर्माण होते. जोडीदाराच्या वागण्यातून (Partner Don’t Want To Be In Relationship) नात्यातला दुरावा कसा ओळखता येईल, याबाबत ‘सेट बाउंड्रीज, फाइंड पीस’ या पुस्तकाच्या लेखिका, रिलेशनशिप एक्स्पर्ट आणि थेरपीस्ट Nedra Glover Tawwab यांनी मार्गदर्शन केलं आहे. हिंदुस्थान टाइम्सनं याविषयी सविस्तर वृत्त दिलं आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. लव्ह मॅरेजसाठी घरच्यांना मनवण्याचं टेन्शन आता सोडा; फक्त ‘या’ गोष्टी करा आणि होकार मिळालाच समजा एखादी व्यक्ती नातं निभावण्यासाठी उत्सुक नसल्यास जोडीदाराच्या वागण्यातून (How To Understand Your Partner Behaviour) ओळखता येतं, असं त्यांचं म्हणणं आहे. संवाद (Communication) हे नातं निभावण्याचं प्रभावी माध्यम आहे. जोडीदार जेव्हा तुमच्या फोनला किंवा मेसेजला प्रत्युत्तर देत नाही, तेव्हा काहीतरी बिनसलं आहे, हे लक्षात घ्यावं. विशेषतः जेव्हा जोडीदार आधीप्रमाणे वागत नाही तेव्हा नात्याकडे काळजीनं पाहण्याची गरज असते. Health Tips : प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खा ही भाजी, स्त्री-पुरुष दोघांचा वाढेल स्टॅमिना जोडीदाराकडून वारंवार दुखावलं (Get Hurted By Partner) जाणं, हे नातं तोडण्याचं चिन्हं असतं. एखादी गोष्ट करण्यासाठी, कार्यक्रमासाठी येणं टाळलं जातं, हीदेखील नात्यातला दुरावा वाढू लागल्याची लक्षणं असतात. नात्यात प्रेम असतं तेव्हा जोडीदार एकमेकांची काळजी घेतात, छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष देतात; मात्र जेव्हा नात्यात दुरावा येतो, तेव्हा अशा प्रकारे काळजी घेतली जात नाही. याचाच अर्थ जोडीदाराला नातं संपवण्याची इच्छा आहे. संवाद टाळणं, दुर्लक्ष करणं, एखाद्याच्या माध्यमातून संवाद साधणं म्हणजे नात्यामधलं प्रेम संपत चालल्याचं लक्षण असतं. जोडीदार दोघांच्या भविष्याविषयी काही न बोलता स्वतःविषयीच बोलू लागतो तेव्हा त्याला नात्यात रस उरला नाही हे जाणवतं.

संबंधित बातम्या

नात्यांमधला दुरावा शब्दांऐवजी जोडीदाराच्या वागण्यातून व्यक्त होतो. काही वेळा जोडीदार थेट नकार देतो, तर काही वेळा आडून गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. ते वेळीच ओळखलं तर नातं टिकवण्यासाठी काही प्रयत्न करता येतो. अन्यथा नातं तुटण्याची शक्यता असते. नव्याचे नऊ दिवस संपले की संसाराचं रहाटगाडगं सुरू होतं. त्यात कधी वादाचे, काळजीचे, रुसव्याचे प्रसंग येतात. ते निभावून नौका पुढे नेता आली, तर ती तिरापर्यंत पोहोचते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या