मुंबई, 26 ऑगस्ट : पाणी हे आपल्याला मिळालेलं सर्वांत उत्तम पेय आहे. माणसाला जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज असते हे तर आपल्याला माहिती आहेच; मात्र पाण्याचे आपल्या शरीराला कित्येक फायदेही (Benefits of drinking enough water) होतात. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे आपली त्वचा फ्रेश राहते, पचनशक्ती चांगली राहते, किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो आणि असे असंख्य फायदे (Water drinking benefits) आपल्याला पाण्यामुळे मिळतात; मात्र कित्येकांना पाणी पिण्याची योग्य पद्धतच (Correct way to drink water) माहिती नसते. तुम्हाला असं वाटत असेल, की पाणी पिण्याची योग्य पद्धत कसली, तर तुम्हीदेखील त्यांपैकीच एक आहात. आयुर्वेदामध्ये (Water drinking tips from Ayurveda) पाणी पिण्याचे फायदे तर सांगितले आहेतच; मात्र पाणी पिण्याची योग्य पद्धतही सांगितली आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या. आयुर्वेद प्रॅक्टिशनर असणाऱ्या डॉ. रेखा राधामोनी यांनी याबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ अपलोड करून त्यांनी त्यामध्ये पाणी पिण्याची योग्य पद्धत (Proper way to drink water) सांगितली आहे. त्यांच्या या व्हिडिओला सात हजारांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. घरातली वडिलधारी मंडळी सांगत असतात, की पाणी नेहमी बसून प्यायलं पाहिजे; मात्र कित्येक जण याकडे दुर्लक्ष करतात. ही गोष्ट आयुर्वेदातही सांगितली आहे. पाणी नेहमी खाली बसून (How to drink water) आणि एक-एक घोट असं प्यावं. एकदम घटाघट पाणी प्यायल्यास शरीराला त्याचा काहीच फायदा होत नाही. बऱ्याच जणांना फ्रीजमधून पाण्याची बाटली काढून थेट पाणी पिण्याची सवय असते; मात्र हे चुकीचं आहे. डॉ. राधामोनी सांगतात, की नेहमी कोमट किंवा रूम टेम्परेचरला (Warm water benefits) असलेलं पाणी पिणं फायद्याचं ठरतं. गार पाणी प्यायल्यामुळे पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो. पचनशक्ती सुधारण्यासाठी उकळून मग साधारण तापमानावर आणलेलं पाणी प्यावं. उकळण्यासाठी घेतलेलं पाणी एक तृतीयांश, एक चतुर्थांश किंवा निम्मं होईपर्यंत उकळणं अधिक फायद्याचं ठरतं. डॉ. राधामोनी यांनी सांगितलं, की त्या पाणी उकळताना त्यात जिरंदेखील (Benefits of Cumin water) घालतात. जिऱ्याचं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. अर्थात, उन्हाळ्यामध्ये त्या पाण्यात जिऱ्याऐवजी व्हेटिव्हर रूट्स (Vetiver roots) घालतात, असंही त्यांनी आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. पाणी साठवण्यासाठीचे नियम आयुर्वेदात असं सांगितलं आहे, की नेहमी साठवून ठेवलेलं पाणी प्यावं. वाहतं पाणी कधीही पिऊ नये. तसंच, पाणी साठवण्यासाठी मातीचं मडकं किंवा तांबं वा स्टीलच्या भांड्याचा उपयोग करावा. सध्या बाजारात तांब्यापासून बनलेल्या पाण्याच्या बाटल्याही उपलब्ध आहेत. त्या तुम्ही पाणी ठेवण्यासाठी वापरू शकता. कधी आणि किती प्यावं पाणी? दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याची सवय (When to drink water) लावणं गरजेचं आहे. जेवणाच्या 30 मिनिटांपूर्वी पाणी पिणं योग्य ठरते. वात प्रवृत्तीच्या कुपोषित व्यक्तींनी जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी पिणं योग्य आहे. कफ प्रवृत्तीच्या जास्त वजन असणाऱ्या व्यक्तींनी जेवणापूर्वी 30 मिनिटं पाणी पिणं योग्य आहे, असं डॉ. राधामोनी यांनी सांगितलं. दिवसभरात किती पाणी प्यावं (How much water should we drink) यालाही मर्यादा आहे. पाण्यालाही पचण्यास वेळ लागतो. डॉ. राधामोनी सांगतात, की शरीराची पाण्याची गरज ही व्यक्तीनिहाय बदलते. त्यामुळे शरीराच्या काही संकेतांकडे (Signs you’re drinking less water) लक्ष देणं गरजेचं आहे. व्यवस्थित घाम येत नसेल, बद्धकोष्ठता जाणवत असेल, तोंडाला सारखी कोरड पडत असेल, मूत्राचा रंग गडद पिवळा असेल तर आणखी जास्त पाणी पिण्याची गरज आहे हे दिसून येतं. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची नाही, तर योग्य प्रकारे पुरेसं पाणी पिण्याची गरज आहे.