JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रवीना टंडन योगासाठी गेली जंगलात; Yellow Dress Look मुळे ‘टिपटिप बरसा पानी’ची झाली आठवण

रवीना टंडन योगासाठी गेली जंगलात; Yellow Dress Look मुळे ‘टिपटिप बरसा पानी’ची झाली आठवण

रविना टंडनने इंस्टाग्रामवर (Instagram) आपला एक व्हीडिओ शेअर केलेला आहे. ज्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात बसून ती योगासन करते आहे. चाहत्यांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया पाहा काय

जाहिरात

व्हीडिओमध्ये रविना टंडन ध्यान मुद्रेमध्ये बसल्याचं पाहायला मिळतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 24 जून : अभिनयाला रामराम करून संसारात रमलेल्या बऱ्याच अभिनेत्री सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून फॅन्सना भेटत असतात. काही व्हीडिओ (Video)****, फोटोंच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधत असता. माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी,मलायका अरोरा प्रमाणे रविना टंडनही (Actress Raveena Tandon) फॅन्स साठी व्हिडीओ बनवत असते. बॉलीवुड ऍक्ट्रेस रविना टंडनने अनेक वर्ष आपल्या सौंदर्याने सिनेमांवरती राज्य केलं. आता ती सोशल मीडियाद्वारे आपल्या फॅन्सच्या भेटीला येत असते. आपले फोटो आणि काही ब्युटी टिप्स (Beauty Tips) देखील शेअर करत असते. रविना टंडनने इंस्टाग्रामवर (Instagram) आपला एक व्हीडिओ शेअर केलेला आहे. ज्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात बसून ती योगासन करते आहे. या व्हिडिओमध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये (Yellow Dress) दिसते आहे. तिला पाहून ‘मोहरा’ चित्रपटातल्या ‘टिपटिप बरसा पानी’ या तिच्या गाजलेल्या गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ( आहारापासून सेक्स लाईफपर्यंत; शरीराचा वास करोत सगळी गुपितं उघड ) हा व्हीडिओ शेअर करताना तिने सुंदर कॅप्शन दिलं आहे. ती म्हणते, ‘मला नैसर्गिक वातावरणामध्ये मेडिटेशन केल्यामुळे मनःशांती मिळते’. या व्हिडिओमध्ये रविना टंडन ध्यान मुद्रेमध्ये बसल्याचं पाहायला मिळतं.

संबंधित बातम्या

सोशल मीडियावर ऍक्टीव्ह असणाऱ्या सविनाला भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत. तिच्या एक व्हीडिओला किवा फोटोला मिनटात हजारो लाईक्स मिळतात. म्हणून आपल्या ब्युटी टिप्सही ती सांगत असते. याआधीही रविना टंडनने योगा करतानाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ( प्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक! चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलन ) सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ लगेच व्हायरल झाले. योगा करतानाच्या तिच्या या पोस्टला काही मिनिटात 60 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळालेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या