JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोना काळात महिलांमध्ये वाढल्या पाळीच्या समस्या; ही लक्षणं दिसली तर लगेच घ्या डॉक्टरांचा सल्ला

कोरोना काळात महिलांमध्ये वाढल्या पाळीच्या समस्या; ही लक्षणं दिसली तर लगेच घ्या डॉक्टरांचा सल्ला

कोरोना काळात (Corona Period) मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे महिलांना पाळीसंबंधी (Menstruation in women) त्रास सुरू झाले आहेत.

जाहिरात

महिलांना पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना पपईमुळे कमी होतात. पपई खाण्याचे अनेक फायदे असले तरी काही पदार्थांबरोबर पपईचं कॉम्बिनेशन घातक आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 26 जून: दीड वर्षांपासून जगभरात कोरोनेचं (Corona)  थैमान सुरू आहे. कोरोनामुळे जिवीतहानी झाली आहेच शिवाय देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम झाला आहे. याचबरोबर आरोग्य विषयक अनेक समस्या (Health Problem) सुरू झाल्या आहेत. महिलांमध्ये मानसिक तणावामुळे मासीक पाळीसंदर्भातील समस्या सुरू (Menstruation in women) झालेल्या आहेत. डॉक्टरांच्यामते महिलामध्ये अनियमीत पाळी, पाळीच्यावेळी पोट दुखणे, हार्मोनल चेंजेस, अधिक प्रमाणात रक्तस्त्राव**(**Excessive bleeding) असे त्रास सुरू झाले आहेत. पण, खरी समस्या ही आहे की 10 पैकी 9 महिला डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. यासंदर्भात महिलांच्या स्वच्छतेशी संबंधित एव्हर्टीनने सहाव्या वार्षिक मासिक पाळी स्वच्छता सर्वेक्षण अहवालात खुलासा केला आहे त्याच्यानुसार कोरोनाच्या ताणामुळे भारतीय महिलांचं मासिक पाळी चक्र अनियमित झालं आहे. या अहवालासाठी यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊन यांचा महिलांच्या पाळीवर झालेल्या परिणामाचा अभ्यास केला गेला. या सर्वेत सहभागी झालेल्या महिलांपैकी केवळ 13.7 टक्के महिलांना कोरोना झाला होता. तरी सर्वेतील 41 टक्के महिलांनी मासिक पाळी चक्र अनियमित झाल्याचं सांगितलं. या सर्वेत भारतातील दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता सारख्या प्रमुख शहरांमधील 18 ते 35 वयोगटातील 5000 महिलांनी सहभाग घेतला. ( पारंपरिक साडीचा नवा लुक; फॅशनिस्टांनाही पडलीये भुरळ ) महत्वाचं म्हणजे महिलांना आपल्या मासिक पाळीच्या समस्यांसंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्यायला आवडत नसल्याचं लक्षात आलं आहे. 10 पैकी 9 महिला डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत असं अहवाल सांगतो. तर, केवळ 11 टक्के महिला पाळीबद्दल चर्चा करतात. 34 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 74 टक्के महिला पाळीच्या काळात स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी करतात. आजही महिलांच्या मनात मासिक पाळीसंदर्भात काही ग्रह आहेत. 53 टक्के महिला धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. मात्र 76 टक्के 34 वर्षांपेक्षा कमी वयाच्या म्हणजे तरूण महिलांना धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यात काहीच चुकीचं वाटत नाही. ( रोज खा ‘हे’ पदार्थ;आयुष्यातला हरवलेला ‘तो’ आनंद येईल परत ) सर्वेक्षणानुसार, 64 टक्के महिलांना मासिक पाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात पोटदुखीचा त्रास होतो. डॉक्टरांच्या मते मासिक पाळीबाबत देशात स्थिती चांगली नसली तरी दुसरीकडे तरुण पिढीची जागरूकता थोडीशी दिलासा देणारी आहे. यासंदर्भात महिलांना सुरूवातीच्या काळातच जागृत करायला हवं असा सल्ला डॉक्टर देतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या