JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पुदीन्यामुळे पचनशक्ती सुधारण्याबरोबर झटपट weight loss; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

पुदीन्यामुळे पचनशक्ती सुधारण्याबरोबर झटपट weight loss; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

पुदीनामध्ये कमी कॅलरीज आणि हाय फायबर असतं. त्यामुळे मेटाबॉलिजम वाढतं, डायजेशन सुधारून कोलेस्ट्रॉल लेव्हल (Cholesterol level)कमी होते.

जाहिरात

पुदीना या नावाने ओळखला जाणाऱ्या औषधी वनस्पतीलाच इंग्लिशमध्ये Mint असं म्हणतात. पुदीन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, मळमळणं, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठीही होतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 11 जुलै : भारतात पुदीना या नावाने ओळखला जाणाऱ्या वनस्पतीलाच इंग्लिशमध्ये  Mint असं म्हणतात. ही एक औषधी वनस्पती **(Herbs)असून हिचे अनेक फायदे आहेत. पुदीनाचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, मळमळणं, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठीही होतो. गुणधर्माने थंड (Cooling Properties) असणारा पुदीना आपण वेगवेगळे पदार्थ बनवताना वापरत असतो. पुदीनाने जेवणाची चवही(Test)**वाढते आणि पुदीना खाल्ल्यामुळे अन्नपचन **(Digestion)**चांगलं होतं. तर, श्वासाच्या त्रासात फायदा  होतो. पुदीन्यामध्ये मेन्थॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदके, व्हिटॅमिन-ए, राइबोफ्लेविन, तांबं आणि लोह आढळतात. कमी कॅलरीज आणि हाय फायबर असतं. ज्यामुळे डायजेशन सुधारून कोलेस्ट्रॉल लेव्हल **(Cholesterol level)कमी होते आणि यामुळे वजन वाढण्याची(Weight Gain)**भीती देखील राहत नाही. ( बाळ होण्यासाठी आयुष्यभराची पुंजी खर्च केली; जन्मलं डाऊन सिंड्रोम मूल मग आईने… ) पुदना खाण्याची पद्धत दररोज पुदीना खायचा असेल तर त्याचा पाण्यामध्ये वापर करता येऊ शकतो. पाण्याच्या बाटलीमध्ये पुदीनाची सात ते आठ पानं टाका. रात्रभर हे पाणी फ्रीजमध्ये ठेवून द्या. दिवसभर हे पाणी प्या नुसतं पाणी पिणं शक्य नसेल तर, यामध्ये लिंबू देखील मिळू शकता. याशिवाय पुदीनाची चटणी, रायता, पुदिना चहा देखील तुम्ही घेऊ शकता. ( पनीरच आहे वेट लॉसचं ‘Secret’; पण खाण्याची पद्धत बदला ) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर पुदीना खाल्ल्यामुळे मेटाबॉलिजम वाढतं. त्यामुळे अनावश्यक चरबी कमी होते. पुदीन्यामधील मधले काही फॅट्स शरीराला एनर्जी निर्मितीत मदत करतात. पुदीना खाल्ल्यावर पचनशक्ती मजबूत होते आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. ( पावसाळ्यातले आजार पळवाचे असतील तर; हे 2 पदार्थ एकत्र खा! लगेच होईल फायदा ) हृदयासंबंधी आजार डायबिटीस, कॅन्सर, हायपरटेन्शन सारख्या आजारामुळे वजन वाढायला सुरुवात होते. त्यामुळे पुदिना जर नियमित खाल्ला तर असे आजारही होत नाहीत. गॅस, एसिडिटी, पोट, फुगणं अशा समस्या असतील तर त्यासाठी पुदिना अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे पोटामध्ये थंडावा निर्माण होतो आणि गॅस झाला असेल तर बरं वाटतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या