JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक

अगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक

भेसळयुक्त बेसन पीठ खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. बाजारातून पीठ आणल्यावर ही सोपी चाचणी करून पाहा..

जाहिरात

बेसन पिठात सुद्धा भेसळ केली जात असल्याचं बोललं जातंय.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 22 जून: प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात बेसन पीठ (Gram Flour) असतं. बेसन पीठ किंवा चण्याच्या पिठापासून अनेक पदार्थ बनवले जातात. बेसन पीठ पौष्टिक (Healthy) तर असतंच शिवाय याचे पदार्थ ही चविष्ट (Tasty) लागतात. त्यामुळेच बेसन प्रत्येक स्वयंपाक घराचा अविभाज्य भाग असतं. बेसन पिठापासून विविध भाज्या,मिठाई,लाडू बनवले जातात. शिवाय बेसन पीठ त्वचेवर (Skin) लावल्याने त्याचेही अनेक फायदे होतात. मात्र,आजकाल कितीतरी पदार्थांमध्ये भेसळ (Adulteration) व्हायला लागलेली आहे. बेसन पिठात सुद्धा भेसळ केली जात असल्याचं बोललं जातंय. कंपन्यांनी कितीही दावे केले तरी देखील तो पदार्थ घरी आणताना त्याबद्दलच्या सुद्धतेची शास्वती मनात नसते. अनेक ब्रॅन्ड जाहिरातीमध्ये आपलेच प्रोडक्ट शुद्ध असल्याचा दावा करतात. मात्र, भेसळयुक्त पदार्थ ओळखणं फार कठीण असतं. या पदार्थांचे रंग खऱ्या पदार्थां सारखेच असल्यामुळे ओळखता येत नाही. भेसळयुक्त बेसन पीठ खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे सांधेदुखी, पोटाचे आजार, अगदी अवयवांना नुकसान (Disability) देखील होऊ शकतं. यासंदर्भात झी न्युज ने माहिती दिली आहे. त्यामुळे वेळीच भेसळयुक्त बेसन ओळखणं आवश्यक आहे. आपल्या स्वयंपाक घरात मधलं बेसनपीठ खरंच शुद्ध आहे का ? ओळखायचं असेल तर, काही ट्रिक्स करू शकतो. ( Dry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत ) हायड्रोक्लोरिक ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या मदतीने अशुद्ध बेसनपीठ ओळखता येऊ शकतं. एका भांड्यात 2 चमचे बेसन पीठ घ्या. त्यात पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा. आता या मध्ये 2 चमचे हायड्रोक्‍लोरिक ऍसिड टाका. 5 मिनिटांनंतर याचा रंग बदलून लाल झाला तर समजा या बेसनामध्ये भेसळ झालेली आहे. ( Vastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा! ) लिंबाचा वापर 2 चमचे बेसन पीठ घ्या. त्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस मिसळा. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड टाका. थोडावेळ ठेवल्यानंतर बेसन पिठाचा रंग तांबूस लालसर होताना दिसला तर बेसन भेसळयुक्त आहे असं समजा. ( डबल चीन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा योगा, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी ) बेसन पिठामध्ये भेसळ कशी होते चण्याच्या डाळीपासून बेसन पीठ बनवलं जातं मात्र, जास्त नफा कमावण्याच्या नादामध्ये 25 टक्के बेसन पीठ वापरून त्यामध्ये 75 टक्के रवा, वटाण्याचं पीठ, मका किंवा तांदळाचं पीठ वापरलं जातं. शिवाय बेसन पिठासारखा रंग दिसण्यासाठी केमिकलयुक्त रंग वापरले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या