हृदय निरोगी ठेवण्यासाठी पेकन नट खुप फायदेशीर ड्रायफ्रुट आहे.
दिल्ली, 28 जुलै : पेकन नट (Pecan Nuts) म्हणजे काय आहेत हेच बऱ्याच जणांना माहिती नसेल. आपल्या देशात इतके खाल्लेही जात नाहीत. पण, हे आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर आणि औषधी मानले जातात. मेक्सिको आणि अमेरिकेच्या (Mexico & United States) काही भागात आढळणारे पेकन नट ड्रायफ्रुट खरंच बर्याच पौष्टिक **(Nutrients)**घटकांनी परिपूर्ण आहेत. यात व्हिटॅमिन ए,व्हिटॅमिन ई,झिंक,ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स,कॅल्शियम, मॅग्नेशियम,पोटॅशियम असतं. याशिवाय लोह,फॉस्फरस,व्हिटॅमिन बी 6,प्रोटिन, कॅलरीज,फायबर आपल्याला निरोगी ठेवतात. जाणून घेऊयात पेकन नट खाण्याने कोणते आजार दूर राहू शकतात. हेल्दी हार्ट हृदय निरोगी ठेवण्यासाठी पेकन नट खुप फायदेशीर ड्रायफ्रुट आहे. यामध्ये असलेलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम रक्तदाब कमी ठेवण्यात मदत करतं. याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो. ज्यामुळे हृदयरोग होत नाहीत. ( मायग्रेनचा त्रास घालवण्यासाठी करा ‘ही’ योगमुद्रा; कोणत्याही वेळी करू शकता ध्यान ) मधुमेह होत नाही संशोधनानुसार ज्यांना हृदय रोग आहे त्यांनी डायबेटिजपासून बचावासाठी पेकन नट खावेत. हे चांगला आहार ठरु शकतं. त्यामुले आपलं पोट भरलेलं राहतं आणि रक्तातील साखरेची पातळी देखील संतुलीत राहते. ( वर्षभर प्रयत्न करून झाली नाही गर्भधारणा; पतीचं खरं रूप समोर येताच घेतला घटस्फोट ) संधिवात****ात वेदना कमी होतात यातील ओमेगा-3 फॅटी अॅसिड सुज कमी करंत, सांधेदुखीत आराम मिळतो. याशिवाय त्यामध्ये असलेलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन ई आणि झिंक देखील इन्फ्लामेशन कमी करतं. ( लय भारी! फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार ) अॅ****न्टी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध त्यात मुबलक अॅन्टी-ऑक्सिडन्ट गुणधर्म आहेत. जे बरेच रोग दूर ठेवतात. अल्झायमर, पार्किन्सन बरा करण्यात देखील उपयुक्त आहेत. रोग प्रतिकारशक्ती देखील मजबूत करतात.