पाणी पिणे - अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला हरकत नाही.
नवी दिल्ली, 15 मार्च : निरोगी राहण्यासाठी पाणी पिणं (Drinking water) खूप गरजेचं आहे. त्यामुळे डिहायड्रेशन (Dehydration) होत नाही. त्यामुळे पोटात साचलेली घाण बाहेर पडण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्वचा निरोगी राहते. पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे (Benefits of drinking water) आहेत. रोज किमान 2-3 लीटर पाणी प्यायला हवे असे तज्ज्ञ सांगतात, पण काही लोक असे आहेत जे दिवसातून 5-6 लिटर पाणी पितात. काही लोक पिंपल्स, कोरडेपणा, तरुण दिसण्यासाठी, त्वचेच्या समस्या कमी (Water benefits for skin) करण्याच्या प्रयत्नात जास्त पाणी पिण्यास सुरुवात करतात. अर्थात, पाणी प्यायल्यानं त्वचेसोबतच शरीराचे अनेक अवयव निरोगी राहतात, त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडते. मात्र, जास्त पाणी पिल्याने आरोग्याला अनेक प्रकारे (Side Effects Of Drinking Excess Water) नुकसान होते. जास्त पाणी का पिऊ नये फोर्टिस हॉस्पिटलचे (मुंबई) जनरल फिजिशियन डॉ. प्रदीप शाह म्हणतात की, कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात घेणं शरीरालाच हानीकारकच ठरतं. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती एका दिवसात शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्यास सुरुवात करते, तेव्हा त्रास नक्कीच होतो. साधारणपणे शरीराला दिवसाला 2 लिटर पाण्याची गरज असते. जास्तीत जास्त 3 लिटर पिऊ शकतो. यापेक्षा जास्त प्यायल्यास वॉटर इंटॉक्सिकेशन किंवा वॉटर प्वॉइजनिंग होऊ शकते. जास्त पाणी प्यायल्यानं इंटॉक्सिकेशन होत जातं. यामध्ये इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडते. हे वाचा - रात्री जेवल्यानंतर किमान इतका वेळ तरी चालायला हवं; नंतर आजारांवरील वाचेल खर्च डॉ. प्रदीप शहा सांगतात की, जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियम फारच कमी होतं. ज्यामुळे काही वेळा सौम्य दिसणारी लक्षणं काही गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात. मॅरेथॉन, ट्रायथलॉनमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये त्याचा धोका जास्त असतो. वॉटर इंटॉक्सिकेशनच्या सौम्य लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, डोकेदुखी यांचा समावेश असू शकतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये, फेफरे, कोमा आणि मृत्यूही होऊ शकतो. शरीरातील अतिरिक्त सोडियममुळे मेंदू आणि शरीराच्या पेशींमध्ये सूज येते, ज्याला सेल्युलर सूज म्हणतात. मेंदूच्या पेशींमध्ये सूज आल्यास, व्यक्तीला अस्वस्थ, तंद्री, पेटके, स्नायू कमकुवत होणे, उच्च रक्तदाब इत्यादी त्रास होतात. जर एखाद्या व्यक्तीने 10 लिटर पाणी प्यायले तर रक्तातील सोडियमची पातळी आणखी कमी होते, ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. यामुळे व्यक्ती कोमात जाऊ शकते आणि मृत्यूही होऊ शकतो. हे वाचा - शरीरात अशी लक्षणं दिसत असतील तर सावधान! ही Diabetes ची सुरुवात असू शकते दिवसातून किती पाणी प्यावे दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिणं आरोग्यासाठी चांगले असते. जेव्हा तुम्ही एखादा दिवस 7-8 लिटर पाणी पिण्यास सुरुवात करता आणि नंतर एक किंवा दोन दिवस तितकं प्यायला नाहीत, तर निर्जलीकरण होऊ शकतं. यामुळे किडनी खराब होऊ शकते, किडनी स्टोन तयार होऊ शकतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)