हिरव्या पालेभाज्या आणि फळं भरपूर प्रमाणात खा.
मुंबई, 12 जून : पालेभाज्या खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परिणाणी अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात. जीवनसत्त्व, प्रथिनं आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या पालेभाज्या आपल्या आहारात समाविष्ट केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. पालेभाज्यांमधले पोषक घटक रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. जाणून घ्या आहारात पालेभाज्यांचा समावेश केल्याने कोणकोणते फायदे होतात. पालेभाज्यांच्या सेवनामुळे शरीरात चरबी वाढत नाही आणि पोटही भरल्यासारखं वाटतं. पोटाच्या आजूबाजूला जमा होणारी चरबी कमी करण्याचं काम पालेभाज्या करतात. पालेभाज्यांच्या सेवनाने पोटचा घेर कमी होतो. कॅलरीज कमी होतात आणि भूकही कमी लागते. मधुमेह टाळता येऊ शकतो, त्यासाठी ‘असा’ असायला हवा आहार जेव्हा शरीरातल्या लोह घटकाचं प्रमाण कमी होतं तेव्हा रक्ताची कमी प्रमाणात निर्मिती होते. पालेभाज्या याच लोह घटकाच्या निर्मिचीचं काम करतात. पालक, सोया, मेथी यामध्ये भरपूर लोह घटक असतात. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे किडनीस्टोनची समस्या निर्माण होते. नियमित पालेभाज्यांचं सेवन केल्यास स्टोन होण्याची समस्या कमी होते. पालेभाज्यांच्या सेवनामुळे शरीरातील घाण बाहेर पडते, किडनीमध्ये अॅसिड जमा होत नाही. त्यामुळे स्टोनची शक्यता कमी होते. पालेभाज्यांमध्ये लोह तत्त्वाबरोबरच विरघळणारं फायबर, मिनरल्स, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाला तुमच्यापासून दूर ठेवायचं असेल तर आहारात पालेभाज्यांचा समावेश तुम्ही करायलाच हवा. पालेभाज्यांमुळे संसर्गजन्य आजार देखीर दूर राहतात. गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी बनवा ‘हा’ पदार्थ पालेभाज्या आणि त्यांचे गुणतत्त्व - पालक - रक्तवाढीसाठी आणि हाडे बळकट करण्यसाठी गुणकारी. अंबाडी - ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी-खोकला कमी होतो. माठ - लाल माठामुळे रक्तवृद्धी होते. हिरवा माठामुळे वजन वाढतं, पित्ताचा त्रास होत नाही. तांदुळजा - डोळ्याचे विकार, मलावरोध यासाठी उपयुक्त, बाळंतीण आणि गरोदर महिलेसाठी उपयुक्त. घोळ - पचनक्रिया आणि यकृताचे कार्य सुधारते. चाकवत - ताप, अशक्तपणा, अॅसिडिटीसाठी गुणकारी. मेथी - मधुमेहींसाठी उपयुक्त. पचनक्रिया सुधारते, गॅसेसचा त्रास होत नाही. आळू - रक्तवृद्धी, मलावरोध, बाळिंतीणीला दूध कमी येत असल्यास गुणकारी. शेपू - गॅसेस, पोटदुखी, चंत आणि अनियमित मासिक पाळीसाठी उपयुक्त.