JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'हे काम कर लागेल मुलांची लाइन'; लग्नासाठी मुलगा न सापडणाऱ्या नातीला आजीने दिल्या टिप्स

'हे काम कर लागेल मुलांची लाइन'; लग्नासाठी मुलगा न सापडणाऱ्या नातीला आजीने दिल्या टिप्स

आजीने नातीला जबरदस्त फंडा दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जून : लग्नासाठी (Wedding) जोडीदार शोधणं म्हणजे कोणत्या परीक्षेपेक्षा कमी नाही आहे. किती तरी लोक अनुभवी व्यक्तींकडून याबाबत सल्ला घेतात. एका नातीने (Grand daughter) असाच सल्ला चक्क आपल्या आजीकडून (Grand mother) घेतला आहे. लग्न करायचं आहे पण मुलगाच सापडत नाही आहे, असं नातीने सांगताच आजीने तिला एक फंडा सांगितला. ज्यामुळे मुलांची लाइन लागेल असा दावा तिने केला. आजी-नातीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ खूपच मजेशीर (Funny video) आहे. नातीसाठी आजी लव्हगुरू झाली आणि तिच्या समस्येचं तिने निराकारणही अगदी काही क्षणात केलं.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता आजी आणि नातीचा लग्नावरून संवाद सुरू आहे. नात सुरुवातीला म्हणते, आजी मला लग्न करायचं आहे पण मुलगा सापडत नाही आहे. त्यावर आजी म्हणजे इतक्या सुंदर मुलीला मुलगा कसा सापडत नाही. एकदा तयार होऊन रस्त्यावर बाहेर पड. मग बघ काय होतं. त्यावर नात म्हणते आताच मी रस्त्यावरून आले आहे. मग आजी म्हणते किती मेलेले दिसले?. या मजेशीर उत्तरासह आजी आणि नात दोघीही हसू लागतात. हे वाचा -  पती’राजा’चा थाट तर पाहा! आधी बायकोने त्याच्या पायातील चपलाही काढल्या आणि… या आजीचं सोशल मीडियावर खूप कौतुक होतं आहे. आजीचं वय जरी झालं असेल तरी तिचा लव्ह फंडा कमालीचा आहे. अनेकांना हा फॉलोही करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या