JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लठ्ठपणामुळे मित्र करत होते चेष्टा; कठोर परिश्रमातून बदल घडवून तिनं दिलं सडेतोड उत्तर

लठ्ठपणामुळे मित्र करत होते चेष्टा; कठोर परिश्रमातून बदल घडवून तिनं दिलं सडेतोड उत्तर

अॅनीने आपल्या अतिरिक्त लठ्ठपणावर (Severe Obesity) मात करून आपलं आयुष्य रुळावर आणण्यासाठी कठोर परिश्रम केले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फ्लोरिडा : लठ्ठपणामुळे (Obesity) अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो, तसाच लोकांच्या टोमण्यांचाही. लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींना अन्य व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या बॉडी शेमिंगला (Body Shaming) सामोरं जावं लागतं. अतिरिक्त वजन असणाऱ्या व्यक्तीची खिल्ली उडवणं हा आपला अधिकार आहे, असं काही जणांना वाटतं; मात्र काही लोक याला पॉझिटिव्ह क्रिटिसिझम (Positive Criticism) समजून स्वतःमध्ये बदल करण्याचा निश्चय करतात. असंच काहीसं फ्लोरिडा (Florida) येथे राहणाऱ्या 19 वर्षीय अॅनी स्टॉलिंग्जच्या बाबतीत (Anne Stallings) घडलं. अॅनीने आपल्या अतिरिक्त लठ्ठपणावर (Severe Obesity) मात करून आपलं आयुष्य रुळावर आणण्यासाठी कठोर परिश्रम केले. ‘मी वयाच्या 8व्या वर्षापासून लठ्ठपणाचा सामना करत होते; मात्र 2019 मध्ये माझ्या आजोबांच्या निधनानंतर मला बरं वाटावं आणि मी दुःखातून सावरावं यासाठी खाण्याला प्राधान्य दिलं. त्यानंतर मी माझ्या खाण्याची सवय नियंत्रणात आणू शकले नाही. मी प्रमाणापेक्षा जास्त जंकफूड (Junk Food) खाऊ लागले. त्यामुळे माझं वजन (Weight) एवढं वाढलं, की माझ्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणी मला वजनावरून चिडवू लागले. फ्रेंड सर्कलमध्ये सर्वांत लठ्ठ व्यक्ती म्हणून माझी ओळख निर्माण झाली. मी एखाद्या मैत्रिणीकडे कपडे मागितले, तर तिच्या पालकांचे कपडे मला बॉडी शेमिंग करण्यासाठी आणून देत असत,’ असं अॅनी स्टॉलिंग्जने सांगितलं. हे वाचा - VIDEO : बळीराजाच्याच पोटावर लाथ; प्रशासकीय अधिकाऱ्याचा संतापजनक प्रकार एक वेळ अशी आली, की अॅनीच्या अतिरिक्त वजनामुळे तिला सोडण्याचा निर्णय तिच्या बॉयफ्रेंडने घेतला आणि त्यांचं ब्रेकअप झालं. यामुळे तिला फार दुःख झालं आणि ती पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात आहार घेऊ लागली. ती जेव्हा 18 वर्षांची होती, तेव्हा तिची उंची 5 फूट 6 इंच, तर वजन 114.3 किलो होतं, असे अॅनीनं सांगितलं. बीएमआय आकडेवारीनुसार तिला सिव्हिअर ओबेसिटीचा त्रास होता. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊन प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो. हे समजताच अॅनी घाबरली. आपल्याला हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोक येऊ नये म्हणून काही तरी केलं पाहिजे असा विचार ती करू लागली. त्यानंतर तिने कॅलरी बर्न (Calorie Burn) करणं सुरू केलं. त्यासोबतच कार्डिओ आणि हाय इंटेन्सिटी वर्कआउट सुरू केलं. एका आठवड्यात 3 पौंड वजन कमी झालं पाहिजे, या दृष्टीने तिने प्रयत्न सुरू केले. सुरुवातीचा काळ खूप निराशाजनक होता. कारण वजन कमी होण्यासाठी खूप वेळ लागत होता. त्यानंतर कठोर परिश्रम आणि नियमितपणे जोरदार व्यायाम करून तिने 10 महिन्यांत 50 किलो वजन कमी केलं. ‘वजन कमी झाल्याने माझं आयुष्य बदललं. माझ्यातला आत्मविश्वास वाढला असून, मी आता स्वतःवर प्रेम करू लागले आहे,’ असं अॅनी सांगते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या