JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / झोपाळ्यावरून पडताच शरीराचे दोन तुकडे झाले तरी तरुणी जिवंत; चमत्कारामुळे डॉक्टरही शॉक

झोपाळ्यावरून पडताच शरीराचे दोन तुकडे झाले तरी तरुणी जिवंत; चमत्कारामुळे डॉक्टरही शॉक

झोपाळ्यावरून पडलेल्या तरुणीची भयंकर अवस्था पाहून डॉक्टरांनाही तिची जगण्याची आशा सोडली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 08 ऑगस्ट : मृत्यू कुणाच्या हातात नाही. तो कधी कुणाला कसा गाठेल आणि मृत्यूच्या दारातून कोण कधी कसं परत येईल सांगू शकत नाही. एका तरुणीसोबत असंच घडलं. झोपाळ्यावरून पडल्यानंतर या तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे झाले पण तरी ही तरुणी जिवंत आहे. डॉक्टरांनी तिच्या जगण्याचीही अपेक्षा नव्हती. पण जिवंत राहून वैद्यकीय क्षेत्रालाही तिने हैराण केलं आहे. यूकेच्या फर्नेसमध्ये राहणारी 21 वर्षांची कोल ऑस्टन झोपाळ्यावरून पडली. त्यांतर तिच्या कमरेखाली गंभीर दुखापत झाली. तिच्या उजव्या पायात फ्रॅक्चर झालं होतं आणि कंबर मोडली होती. शरीराचे आतून दोन तुकडे झाले होते. तिला तात्काळा लंकाशायरमधील रॉयल प्रेस्टॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिची अवस्था पाहताच ती जगण्याची शक्यताच नाही, असं सांगितलं. द मिरर शी बोलताना कोलने सांगितलं की ती जत्रेत गेली होती. त्यावेळी झोपाळ्यावर बसली. एक जोरात झटका लागला आणि ती झोपाळ्यावरून खाली कोसळली. त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि शुद्धीवर आली तेव्हा ती जत्रेत गेली होती हेसुद्धा तिच्या लक्षात नव्हतं. आपला कार अपघात झाला असावा असंच तिला वाटत होते. हे वाचा -  चमत्कार की नशीब! धावत रोड क्रॉस करताना भरधाव ट्रकखाली आली महिला; पण साधं खरचटलंही नाही डॉक्टरांनी तिला सांगितलं की ती कधीच चालू शकत नाही त्यामुळे आता आपलं आयुष्य संपलं असंच तिला वाटत होतं. पण तिने डॉक्टरांनाही चुकीचं ठरवायचं असा निश्चय केला. 22 दिवस ती कोमात होती. तिच्यावर कित्येक सर्जरी झाल्या. अनेक अडचणी पार केल्यानंतर आता ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. तिने फक्त मृत्यूवर मात केली नाही तर आता सर्वसामान्य आयुष्यही ती जगते आहे. ज्या डॉक्टरांच्या टीमने तिचा जीव वाचवला त्यांच्यासोबतच ती काम करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या