JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Fungus मुळे लैंगिकदृष्ट्या उतावळा होतो हा जीव; सलग 4 ते 6 आठवडे संबंधांनंतर होतो मृत्यू

Fungus मुळे लैंगिकदृष्ट्या उतावळा होतो हा जीव; सलग 4 ते 6 आठवडे संबंधांनंतर होतो मृत्यू

फंगस इन्फेक्शनमुळे या जीवांवर विचित्रच परिणाम होतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 20 मे: सध्या कोरोनाच्या संकटात सर्वत्र चर्चा सुरू आहे ती ब्लॅक फंगसची (Black fungus). असे अनेक फंगल इन्फेक्शन आहेत जे जीवघेणे ठरतात. फक्त माणसंच नाही तर पशू-पक्षी आणि कीटकांनाही अशा फंगसचा (Fungus infection) त्रास होतो. एका कीटकावर मात्र फंगसचा असा विचित्र दुष्परिणाम दिसून येतो, ज्याची कल्पनाही आपण केली आहे. फंगसमुळे या कीटकाची लैंगिक इच्छा तीव्र होते आणि सेक्स करता करताच त्यांचा जीवही जातो. हा कीटक म्हणजे सिकाडा (Cicada). रातकिड्यासारखाच पण दिवसा आवाज करणारा हा कीटक. तो  2 इंच लांब लांब असतो, त्याला सहा पंख असतात. त्याचा रंग काळा, त्याचे पंख नारंगी आणि डोळे लाल असतात. या कीटकापासून माणसांना कोणताही धोका नसतो. हा कीटक माणसाला डंक मारत नाही. हा कीटक 17 वर्षांनंतर जमिनीच्या आतून जमिनीच्या पृष्ठभागावर येतो. तज्ज्ञांच्या मते, जमिनीवर येताच सिकाडा विचित्र पद्धतीने वागतात. लैंगिकदृष्ट्या ते खूप आक्रमक होतात.

संबंधित बातम्या

जमिनीतून बाहेर आल्यानंतर  त्यांना मासोस्पारा (Massospora) या फंगसचा (Fungus) संसर्ग होतो. याचा संसर्ग झाल्यावर त्यांची त्वचा झडू लागते. त्यांचं पोटच नाही तर तर जननेंद्रियदेखील बाधित होतात. त्यामुळे हे कीटक स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. ते लैंगिकदृष्ट्या अधिक सक्रिय होतात. नर आणि मादी सिकाडा  4 ते 6 आठवड्यांपर्यंत सेक्स करतात. त्यानंतर मादी  अंडी घालते आणि दोघांचाही मृत्यू होतो. हे वाचा -  OMG! पाचशे, हजार नाही तर तब्बल दीड लाख रुपये एक किलो; सोन्यापेक्षाही महाग मशरूम अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया युनिर्व्हर्सिटीतील वन्य पॅथलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक मॅट कॅसन मासोस्पारावर गेल्या 5 वर्षांपासून यावर संशोधन करीत आहेत. कॅसन यांच्या मते, मासोस्पारा फंगस केवळ 5 टक्के सिकाडांनाच संक्रमित करतो आणि संक्रमित होताना त्यांना कोणत्याही प्रकारच्या वेदना जाणवत नाहीत. wshu.org च्या वृत्तानुसार कॅसन यांनी अमेरिकेतील नॅशनल पब्लिक रेडीओला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ही बुरशी किंवा फंगस रातकिड्यांच्या पाठीवर मागील बाजूस खडू किंवा रबरासारखी चिकटलेली दिसते. या किड्यांना आपल्यासोबत काय घडतं आहे हे समजू शकत नाही. हे फंगस सिकाडांचे पंख ओढतात आणि त्यामुळे त्यांची लैंगिक इच्छा वाढते. संसर्ग झालेले सिकाडा आपल्या जोडीदारासोबत सेक्स करतात, मात्र यामुळे तेही संक्रमित होतात. हा फंगस लैंगिकतेतून संक्रमित आहे. तथापि लैंगिक अवयव खराब झाल्याने रातकिड्यांचा लैंगिक प्रयत्न अयशस्वी ठरतो. हे वाचा -  शारीरिक संबंधांसाठी BFसमोर ठेवलेली अट महागात; तीनदा गाठलं हॉस्पिटल, अखेर ब्रेकअप अमेरिकेतील (America) 15 राज्यांमध्ये सध्या हा कीटक जमिनीवर येताना दिसत आहे. यापूर्वी या भागात 2004 मध्ये हे कीटक जमिनीवर आले होते. आता यानंतर 2038 पर्यंत तरी ते परत जमिनीवर आढळून येणार नाहीत, असं सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या