JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Smoothie मुळे तरुणाची झाली इतकी भयंकर अवस्था; डोळ्यासमोर दिसला मृत्यू

Smoothie मुळे तरुणाची झाली इतकी भयंकर अवस्था; डोळ्यासमोर दिसला मृत्यू

एक्सपरिमेंट म्हणून हा तरुण एक विशिष्ट प्रकारची स्मूथी प्यायला. त्यानंतर त्याची अवस्था भयंकर झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 03 मे : स्मूथी हा कित्येक लोकांचा आवडता पदार्थ. पण अशाच स्मूथीमुळे एक तरुण मृत्यूच्या दारात पोहोचला. स्मूथी खाल्ल्यानंतर त्याची अवस्था इतकी भयंकर झाली की त्याला डोळ्यासमोर अक्षरश: मृत्यू दिसू लागला. एका एक्सपरिमेंटसाठी त्याने ही स्मूथी पिऊन आपला जीव धोक्यात टाकला (For experiment man drinks diarrhoea bacteria smoothie). 26 वर्षांचा रॅट जॅक एबर्टसने शिगेला ही खतरनाक बॅक्टेरिया असलेली स्मूथी प्यायला. हे बॅक्टेरिया डायरियासाठी कारणीभूत ठरतात. यावर उपचार शोधण्यासाठी मेरिलँड युनिव्हर्सिटीची संशोधक अभ्यास करत होते. या संशोधनात रॅट सहभागी झाला होता. हे जीवघेणे बॅक्टेरिया असलेली घाणेरडी स्मूथी तो प्यायला. त्यानंतर त्याची अवस्था भयावह झाली. 11 दिवसांचं हे एक्सपरिमेंट होतं. आपल्या ट्विटरवर तो आपला अनुभवही शेअर करायचा. एक्सपरिमेंटच्या सहाव्या दिवशी त्याने आपला अनुभव खूप वाईट असल्याचं सांगितलं. त्याचं पोट खूप खराब झालं. दोनवेळा तर वॉशरूममध्ये पोहोचण्याआधीच त्याला पॉटी झाली. त्यानंतर त्याला ताप आला, ब्लड प्रेशरही वाढलं. हे वाचा -  कसं शक्य आहे? माणसाने स्पर्श करताच ‘मृत’ झाला साप; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO पण यासाठी पैसे मिळत असल्याने आणि  जर या बॅक्टेरियाविरोधात लस तयार झाली तर दर वर्षी लाखो लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो, यासाठी त्याने हे एक्सपरिमेंटचं चॅलेंज स्वीकारलं.

संबंधित बातम्या

शिगेला बॅक्टेरिया इतका खतरनाक आहे की दरवर्षी यामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. लहान मुलं या बॅक्टेरियाच्या विळख्यात सापडतात. यानंतर वाचण्याची शक्यता खूप कमी होते. हे वाचा -  डासांऐवजी आता माकडं पसरवतायेत जीवघेणा Malaria; प्रशासनाने जारी केला Alert जॅकने आपल्या अनुभवानुसार सांगितलं की, फक्त सहा तासांत त्याला मृत्यू प्रिय वाटू लागला. लहान मुलं कसा याचा सामना करत असतील, याचा विचार तो करू लागला. आता बरं झाल्यानंतर तो पाणी स्वच्छ करण्यासाठी पैसे जमा करू लागला आहे. ज्यामुळे बॅक्टेरिया कमी पसरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या