JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सासरी जाणाऱ्या लेकीवर थुंकतो बाप; इथं लग्नानंतर विचित्र पद्धतीने होते मुलीची पाठवणी

सासरी जाणाऱ्या लेकीवर थुंकतो बाप; इथं लग्नानंतर विचित्र पद्धतीने होते मुलीची पाठवणी

लग्नानंतर मुलीची सासरी पाठवणी करताना घरातून निघताच दरवाजात येईपर्यंत वडील मुलीवर थुंकत राहतात.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नैरोबी, 03 जून: प्रत्येक समाज, धर्म, देशानुसार लग्नाच्या (Wedding) विधी आणि परंपराही (Wedding traditions) वेगवेगळ्या असतात. ज्या कित्येक वर्षांपासून चालत आल्या आहेत. त्यापैकी काही विधी-परंपरा आपल्याला माहिती आहेत तर काही नाही. यात काही विधी-परंपरा इतक्या विचित्र (Bizarre wedding traditions) आहेत, की त्या पाहून किंवा ऐकून आपण हैराण होतो. आतावडीलच मुलीवर थुंकून तिची पाठवणी करतात ही प्रथा वाचून तर तुम्हाला धक्काच बसला असेल नाही का?  (Bride father spits on daughters head). केन्या आणि टान्झानियात मसाई आदिवासी जमातीतील लग्नाची ही विचित्र प्रथा. जिथं इतर लग्नांप्रमाणेच थाटामाटात लग्न केलं जातं. पण मुलीची पाठवणी मात्र विचित्र पद्धतीने होते. एरवी लेकीची पाठवणी करताना वडील आपल्या मुलीला घट्ट मिठी मारून रडताना दिसतात. पण इथं मात्र वडील सासरी जाणाऱ्या मुलीवर थुंकताना दिसतील. लग्न झाल्यानंतर सासरी तिची पाठवणी करताना घरातून दरवाजात येईपर्यंत वडील आपल्या मुलीच्या डोक्यावर थुंकतात. हे वाचा -  मागणी नव्हे तर चक्क मुलीला पळवूनच नेतात; अपहरण करून लग्न करण्याची विचित्र प्रथा ही प्रथा आपल्यासाठी नक्कीच विचित्र आहे.  कारण एखाद्यावर थुंकणं ही सवय म्हणजे आपल्याकडे वाईट मानली जाते. पण आपली ही वाईट सवयच इथंच लग्नात केली जाते. आता ही प्रथा नेमकी कुठे केली जाते, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल नाही का? तर मसाई आदिवासी जमातीत याला वडिलांनी लेकीला दिलेला आशीर्वाद मानला जातो. सामान्यपणे आपण आशीर्वाद घेताना मोठ्यांच्या पायांना स्पर्श करतो आणि आपल्या डोक्यावरून हात फिरवतो किंवा तोच हात आपल्या छातीला लावतो. त्यानंतर मोठी माणसं आपल्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला आशीर्वाद देतात. पण मसाई जमातीत थुंकून आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. हे वाचा -  इथं प्रत्येक पुरुषाच्या 2 बायका! दुसऱ्या लग्नाला नकार दिल्यास मिळते भयानक शिक्षा जर एखादा बाप आपल्या लेकीच्या डोक्यावर थुंकला नाही, तर त्याने तिला आशीर्वाद दिला नाही, असं मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक वडील आपल्या मुलीच्या डोक्यावर थुंकतातच. जेणेकरून तिला आपला आशीर्वाद मिळावा आणि तिचं नवं आयुष्य, संसार सुखाचा व्हावा. लग्नाच्या आणखी काही विचित्र परंपरा. चीनच्या तुजिया समाजात लग्नाच्या एक महिनाआधी होणारी नवरी आणि तिच्या घरातील महिला दररोज एक तास रडतात. याला शुभ मानलं जातं. ग्रीकमध्ये पाहुणे आणि कुटुंबाचे सदस्य मिळून जेवणाच्या प्लेट तोडतात. नवरा-नवरीसाठी हे शुभ मानलं जातं. स्कॉटलंडमध्ये फाटलेलं दूध, मृत मासे, खराब झालेलं अन्न अशी प्रत्येक खराब वस्तू नवरीवर फेकली जाते. आयुष्यात सर्वकाही सांभाळण्याची क्षमता मिळते, असा समज यामागे आहे. बुल्गारियातील एका शहरात नवरीच्या चेहऱ्या पांढरा रंग लावला जातो. त्यानंतर सासरचे लोक तिच्या चेहऱ्यावर पेंटिंग करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या