फ्रूट शेक पिणं आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक, आयुर्वेदात सांगितलंय 'हे' कारण
मुंबई, 08 ऑगस्ट: चांगल्या आरोग्यासाठी आहारात फळं आणि पालेभाज्यांचा समावेश गरजेचा आहे. फळं (Fruits) आणि पालेभाज्यांच्या (Vegetables) सेवनामुळे आरोग्यविषयक तक्रारी दूर होतात, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. बहुतांश लोक नुसती फळं खाण्याऐवजी फळं आणि दूध एकत्र करून फ्रुट शेक पितात. फ्रुट शेक हा आरोग्यसाठी उत्तम असतं, असा सर्वसामान्य समज आहे. पण फ्रुट शेक हा आरोग्यासाठी नुकसानदायी मानला जातो. आयुर्वेदामध्ये (Ayurveda) विरूद्ध आहार ही संकल्पना मांडलेली आहे. फळं आणि दूधाचे (Milk) गुणधर्म विरूद्ध मानले जातात. त्यामुळे फ्रुट शेक प्यायल्याने गंभीर आजार होण्याचा (Harmful Effect of Fruit Shakeon Health) धोका वाढतो. दूध आणि फळांचं सेवन करण्यासाठी एक खास पद्धत आहे. फळं खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिऊ नये, असं तज्ज्ञ सांगतात. नुसतं फळ खाण्याऐवजी बहुतांश लोक फळं आणि दूधाचं मिश्रण असलेला फ्रुट शेक पितात. यातही बनाना शेक (Banana Shake) म्हणजे केळ्याचा शेक आणि मॅंगो शेक (Mango Shake) म्हणजे आंब्याचा शेक सर्वांनाच आवडतो. लहान मुलं हे शेक आवडीनं पितात. पण हे पेय आरोग्यासाठी अपायकारक मानलं जातं. खरं तर आंबा आणि दूध हे आरोग्यासाठी सर्वोत्तम आहेत, असं लहानपणापासून आपण ऐकत असतो. पण आंबा आणि दूधाचं एकत्रित सेवन आरोग्यासाठी अपायकारक मानलं जातं. हे दोन्ही पदार्थ सेवन करण्याची एक खास पद्धत आहे. आंबा किंवा केळी खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने शरीर बलवान होतं. पण कोणतंही फळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणं टाळावं. कोणतंही फळ खाल्ल्यानंतर किमान एक ते दोन तास दूध पिऊ नये. असं केल्यानं दूध आणि फळाचे गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर ठरतात. हेही वाचा- Internation Cat Day 2022: खूपच रंजक आहे ‘आंतरराष्ट्रीय मांजर दिना’चा इतिहास, जाणून व्हाल चकित आयुर्वेदानुसार, दूध आणि फळं एकत्र सेवन करू नयेत. कारण दूध आणि फळांचे गुणधर्म हे एकमेकांच्या विरूद्ध आहेत. फ्रुट शेक प्यायल्यानं पचनक्रियेवर विपरित परिणाम होतो. तसंच यामुळे अवयवांमध्ये वेदना होण्याची शक्यता असते. कोणत्याही फळामध्ये कमीअधिक प्रमाणात सायट्रिक अॅसिड (Citric acid) असतं. या अॅसिडच्या संपर्कात दूध आल्यास ते नासतं. तसंच फळांमध्ये काही आम्ल (Acid) असतात. ही आम्ल दूधात मिसळली गेली तर ती शरीरासाठी अपायकारक ठरतात. फळांमधले काही रासायनिक घटक दूधासोबत पचणं कठीण असतं. त्यामुळे मॅंगो किंवा बनाना शेक पिणं टाळावं. तुम्ही जर सातत्यानं फ्रुट शेक पित असाल तर भविष्यात आरोग्यासंबंधी गंभीर समस्या होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आहारातून फ्रुट शेक वर्ज्य करावा असं वैद्यकीय तज्ज्ञांचं सांगणं आहे.