JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रात्री फास्ट फूड खाल्ल्यानं आरोग्यावर होतो गंभीर परिणाम? अजिबात खाऊ नका 'हे' पदार्थ

रात्री फास्ट फूड खाल्ल्यानं आरोग्यावर होतो गंभीर परिणाम? अजिबात खाऊ नका 'हे' पदार्थ

रात्री खाण्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. रात्री सतत खाल्ल्याने कोलेस्टेरॉलदेखील वाढू शकतात. याचा गंभीर परिणाम आरोग्यावर होतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 जून : रात्री उशिरा अनेकांना काही ना काही खाण्याची सवय असते. मात्र उशिरा खाल्ल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम (Eating at night has bad effects on health) होऊ शकतो. जर तुम्ही उशिरापर्यंत काम करत असाल आणि आधी जेवू शकत नसाल तर तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. अमेरिकेने केलेल्या अभ्यासात उशीरा खाण्यामुळे उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉल वाढवते. रात्री सतत खाल्ल्याने कोलेस्टेरॉलदेखील वाढू शकतात. याचा गंभीर परिणाम आरोग्यावर होतो. तळलेले पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, फास्ट फूड (Fast Food)अवेळी खाल्ल्यानं हृदयावर याचा परिणाम पहायला मिळतो. रात्री झोपायला तयार असतो तेव्हा रक्तदाब 10 टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित असते. पण खाण्याच्या सवयीमुळे ते नेहमीपेक्षा जास्त उंचावते, हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या मते, जे लोक संध्याकाळी जास्त खातात त्यांच्यामध्ये सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीनची जळजळ होण्याची पातळी देखील वाढते. हे ही वाचा -  रक्तदानाशी संबंधित अशा 10 मनोरंजक गोष्टी, ज्यातील सर्व तुम्हाला नक्कीच माहिती नसतील रात्री डाळी आणि कडधान्य खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. रात्रीच्या वेळी डाळी खाणे अपायकारक ठरू शकते. नेहमी रात्रीच्या वेळी हलका आहार घ्यावा. रात्री जड जेवण खाल्ल्याने पोटावर परिणाम होतो. रात्रीची छोटी भूक भागवण्यासाठी पीनट बटर, योगर्ट किंवा प्रोटीन शेकसह सफरचंद किंवा केळी घेऊ शकतात. फॅट-फ्री दही आणि कमी चरबीयुक्त दूध वापरा. अल्कोहोल आणि उच्च-कॅलरी पेये टाळा. स्नॅकसाठी निरोगी आणि स्मार्ट मार्ग निवडा. ज्यामुळे शरिरावर त्याच्या वाईट परिणाम होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या