JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / या वयात करिअरवर फोकस; आई होण्याची आधीच करून ठेवलीय तयारी

या वयात करिअरवर फोकस; आई होण्याची आधीच करून ठेवलीय तयारी

मातृत्व हा महिलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. योग्य वयात मूल व्हावं असं प्रत्येक महिलांना वाटत असतं. मात्र काही कारणास्तव हा निर्णय पुढे ढकलावा लागतो, त्यासाठी हा एक पर्याय…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सध्या मुलीदेखील आपल्या करिअरबाबत अधिक जागृत झाल्या आहेत. केवळ चांगला नवरा मिळावा म्हणून चांगलं शिक्षण घेतलं जात नाही, तर चांगलं करिअर करता यावं, यासाठी मुली धडपडत असतात. करिअरच्या पहिल्या काही वर्षात जर तुम्ही जीव तोडून काम केलं तर पुढे मार्ग सोपा होतो. यासाठी अनेक तरुणी लग्नानंतरही लगेच गर्भधारणेचा विचार न करता तिशीनंतर मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतात. अनेक तर चाळीशीपर्यंतही हा काळ वाढवतात. (काही वेळास हा धोकादायक ठरू शकतो) करिअरसाठी तरुणी आपली आई होण्याची इच्छा काही वेळासाठी बाजूला ठेवतात आणि त्यासाठी त्या एक नवा पर्यायाचा अवलंब करतात. हा आहे एज फ्रीजिंगचा. एग्ज फ्रीजिंग म्हणजे काय? एग फ्रीजिंग वा एग बँकिंग वा ऑसाइट क्रायोप्रिजर्वेशन असिस्टिड रिप्रोडक्टिव टेकनिक (एआरटी) ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्या बाळंतपणाच्या वयात स्त्रीच्या अंडाशयातील अंडी गोठवली जातात आणि नंतर वापरण्यासाठी ती सुरक्षित ठिकाणी साठवली जातात. विविध कारणांमुळे ज्या स्त्रीला नंतर मूल हवं असतं, त्यांची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्याची आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची ही एक पद्धत आहे.

वेळेत निर्णय घेणं गरजेचं?  एग्ज हे ओवरी मधून काढण्याच्या प्रक्रियेला रिट्रीवल असे म्हणतात आणि यात जास्त वेळ सुद्धा लागत नाही. याशिवाय एग फ्रिजिंग प्रक्रियेत कोणता धोका सुद्धा नसतो. परंतू ही प्रक्रिया योग्य वयात होणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आधीच याचा विचार करावा आणि तातडीने एखाद्या तज्ज्ञाची भेट घेऊन प्रक्रिया पूर्ण करावी. याची मुख्य आवश्यकता म्हणजे, वयानुसार स्त्रियांची प्रजनन क्षमता कमी होत असते. अनेकदा काही आजार जडले किंवा विशिष्ट कारणांमुळे एग्जची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्त्रियांनी तरुण वयातच ही प्रक्रिया पूर्ण करावी. बॉलिवूडमध्ये वाढतोय हा ट्रेंड बॉलिवूडमधील अभिनेत्री करिअरच्या काळात आई होऊ इच्छित नाहीत. त्यामुळे त्या अधिकतर या प्रक्रियेचा अवलंब करताना दिसतात. आई होण्यासारख्या सुदंर क्षणाचा अनुभव हा महिलेसाठी खास असतो. मात्र करिअरचा विचार करता अभिनेत्री उशिराने आई होण्याचा निर्णय घेतात. एकता कपूर, तनिशा मुखर्जी, राखी सावंत, सुकीर्ती कांडपाल या अभिनेत्रींना आपल्या एग्ज फ्रीज करून ठेवल्या आहेत. जेणेकरून जेव्हा त्यांना आई होण्याची इच्छा होईल, तेव्हा काही त्रास होणार नाही. एग्ज फ्रीजिंगचा खर्च? एग फ्रीजिंग ही प्रक्रिया फर्टिलिटी मेडिकलसाठी तशी नवी आहे. त्यामुळे काही वेळात यासाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. सर्वसाधारणपणे या प्रक्रियेत दोन प्रकारचा खर्च होतो. यातदेखील आयव्हीएफ प्रक्रियेप्रमाणे महिलेच्या अंडाशयातील एग्ज बाहेर काढणे आणि फ्रीज करण्यासाठी 50 हजार ते 1 लाखांपर्यंत खर्च होऊ शकतो. एग्ज फ्रीज झाल्यानंतर हे फ्रोजन स्टेटमध्ये ठेवण्याचा वार्षिक खर्च साधारण 15 ते 30 हजारांपर्यंत असतो.

अनेक अडचणींमुळे त्या वयात आई होण्यास अडसर… केवळ करिअर हे एकच कारण नाही तर अनेकदा काही शारिरीक कारणांमुळेही गर्भारपणाची इच्छा पुढे ढकलावी लागते. सीमा (नाव बदललेलं आहे) वयाच्या 25 व्या वर्षी कर्करोगाचं निदान झालं होतं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर तिच्या सुखी संसाराला मोठा धक्का बसला होता. त्या काळात ते मुलासाठीही प्रयत्न करीत होते. मात्र कर्करोगाची उपचार प्रक्रिया सुरू करणं आवश्यक होतं. केमोथेरेपीमुळे काही त्रास होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन सीमाने केमेथेरेपी सुरू होण्याआधीच एग्ज फ्रीज करून ठेवले. जेथेकरून कर्करोगातून बाहेर पडल्यानंतर ती आपली मातृत्वाची इच्छा पूर्ण करू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या