JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / जन्मानंतर कोरोनाने जन्मदातीला हिरावलं; काही मिनिटांतच भुकेल्या तान्हुल्याला दूध देण्यासाठी आल्या शेकडो आई

जन्मानंतर कोरोनाने जन्मदातीला हिरावलं; काही मिनिटांतच भुकेल्या तान्हुल्याला दूध देण्यासाठी आल्या शेकडो आई

एक आई कोरोनाने हिरावून घेतली पण बाळाला कित्येक मातांनी आपलं दूध पाजलं.

जाहिरात

मिसकॅरेज, , प्रिक्लेम्पसिया आणि वेळेआधी डिलीव्हरी या सगळ्या गोष्टी महिलेच्या इम्युन रिस्पॉन्सने ठरतात. तर, पार्टनरचे स्पर्म देखील याला कारणीभूत असतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे : चिमुकल्याने (Baby) जगात पाऊल ठेवलं आणि काही सेकंदातच त्याच्या आईला कोरोनाने (Baby’s corona positive mother died) त्याच्यापासून हिरावलं. जन्मदातीचं दूधही (Baby’s need mother’s milk) या बाळाला मिळू शकलं नाही. प्रसूतीच्या वेळेआधीच जन्माला आल्यामुळे आईचं दूध न मिळाल्यास बाळाच्याही जिवाला धोका होता. सोशल मीडियावर ही बातमी पसरली आणि अवघ्या एका मिनिटात शेकडो आई बाळाला दूध देण्यासाठी धावून आल्या. 32 वर्षांची मीनल वेर्णेकर प्रेग्नन्सीत आपल्या आईवडिलांकडे नागपुरात गेली होती. तिथंच तिला कोरोना झाला आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर बाळाचा जीव वाचवण्यासाठी तिचं एमर्जन्सी स्पेशन पेरिमॉर्टेम सिझेरियन करण्यात आलं. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या कोरोनाग्रस्त आईचा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला. बाळाचा जीव वाचवण्यासाठी आईच्या दुधाची गरज होती. या बाळाला दूध हवं असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि किती तरी आई आपलं दूध या बाळाला देण्यासाठी धावून आल्या. हे वाचा -  10 वर्षांनी हलला पाळणा; कोरोनाने 6 महिन्यांतच हिरावला आनंद, चिमुकलीचा घेतला जीव बाळाचे वडील चेतन वेर्णेकर यांना आपल्या बायकोला गमावल्याचं दुःख होतंच. पण जेव्हा त्यांच्या बाळाला आईचं दूध मिळालं, तेव्हा हा आनंद या दुःखाच्या पुढेही काहीच राहिला नाही. कारण हे बाळ म्हणजे त्यांच्या पत्नीची त्यांच्याजवळ असलेली शेवटची निशाणी होती. टाइम्स ऑफ इंडिया शी बोलताना चेतन यांनी सांगितलं, “मी आणि माझं कुटुंबं या सर्व महिलांचे आभर मानतो. जेव्हा त्यांना माझ्या पत्नीचा 32 आठड्याच्या प्रेग्नन्सीत मृत्यू झाला आणि आमच्या नवजात बाळाला फॉर्म्युला दुधाची अलर्जी आहे, हे समजलं. तेव्हा दररोज कित्येक महिलांनी आपलं ब्रेस्ट मिल्क आमच्या बाळासाठी पाठवलं. या महिलांमुळे आमचं बाळ वाचलं आहे” या बाळाला आता डिस्चार्ज देण्यात आलं आहे. आपल्या वडिलांसोबत तो ठाण्यात राहतो, अशी माहिती चेतन यांच्या बहीण शन्नो प्रसादने दिली आहे. “इथं बाळाला दूध मिळावं, यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले. त्यावेळी फेसबुकवरील ब्रेस्टफिडिंद सपोर्ट फॉर इंडियन वुमेन नावाचा ग्रुप त्यांच्या मदतीसाठी आला. सोशल मीडियावर ही बातमी पसरली आणि बाळाला दूध देण्याची इच्छा अनेक मातांनी व्यक्त केली”, असं शन्नो म्हणाल्या. हे वाचा -  लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा; पहिल्या कोरोना लशीला हिरवा कंदील नाया बेदी नावाच्या ट्विटर युझरने या बाळाबाबत आपल्या ट्विटवरही पोस्ट केली होती. “ठाण्यात आणण्यात आलेल्या या प्रिमॅच्युर बाळाच्या आईचा मृत्यू झाला आहे, त्याला आईच्या दुधाची गरज आहे, हे समजलं. त्यानंतर याबाबत मी ऑनलाइन माहिती दिली आणि काही मिनिटांतच मला 100 रिप्लाय आले. या सर्वांना त्या बाळाला मदत करायची होती. हे पाहून मी शॉक झाले”, असं नाया यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या