JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फक्त 14 दिवस आणि 3 टप्पे; कोरोनाविरोधी लढा जिंकण्याचा बेस्ट फॉर्म्युला

फक्त 14 दिवस आणि 3 टप्पे; कोरोनाविरोधी लढा जिंकण्याचा बेस्ट फॉर्म्युला

कोरोना रुग्णांना 14 दिवस आयसोलेशनमध्ये (Isolation) राहण्याचा सल्ला दिला जात आहे. हे 14 दिवसच का? या 14 दिवसांत नेमकं काय होतं? कोरोना रुग्ण कसा बरा होतो?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल : देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग वेगाने फैलावताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये आता बेडस शिल्लक नसल्याचं चित्र आहे. एकूण आरोग्य व्यवस्था कोलमडून गेल्याने बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांना 14 दिवस आयसोलेशनमध्ये (Home isolation) राहण्याचा सल्ला दिला जात आहे. 14 दिवसांत कोरोनाचा विषाणू तुमच्या शरीरावर कसा परिणाम करतो, तुम्ही या विषाणूला कसं हरवू शकता, याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कोरोनाविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी एसओपी (SOP) म्हणजेच स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नेमकी काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. यामुळे कोरोनाचे 3 टप्पे तुम्हाला समजू शकतील. पहिला टप्पा - हा सुरुवातीच्या 4 दिवसांपर्यंत असतो जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आणि तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर घाबरून जाण्याचे कारण नाही. सुरुवातीचे 4 दिवस यावर विशेष लक्ष ठेवणं आवश्यक आहे. या कालावधीत विषाणू तुमच्या घशात असतो आणि शरीरात पसरण्याचा प्रयत्न करतो. या कालावधीत विषाणू शक्तिशाली असतो. या दरम्यान पोषक आहार आणि व्यायामाच्या माध्यमातून फुफ्फुसाची (Lungs) क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. हे वाचा -  बापरे!  राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता या कालावधीत आपली ऑक्सिजन पातळी (Oxygen Level), रक्तदाब आणि शरीराचे तापमान (Temperature) वारंवार तपासावं. याबरोबरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सीआरपी, सीबीसी, एलएफटी, एल डी एच,डी-डिमर,आयएल-6, सिरम फेरिटिन, प्रोकॅल्सिटॉनिन, युरिया क्रिएटीनाईन, छातीचा एचआरसीटी स्कॅन आदी तपासण्या कराव्यात. दुसरा टप्पा - याचा प्रभाव 5 ते 9 दिवसांदरम्यान असतो या टप्प्यात ताप कमी होऊ लागतो. या कालावधीत प्रोटीनयुक्त आहार सेवनावर भर द्यावा. पाठ स्ट्रेचिंगचा व्यायाम करावा. कारण या टप्प्यात तीव्र पाठदुखी आणि अंगदुखीची तक्रार रुग्ण करीत असतात. तसंच वाफ घ्यावी. ऑक्सिजन पातळी आणि तापमान वारंवार तपासावं. सूप किंवा चहासोबत बार्लीचं सेवन करावं. या कालावधीत दररोज 2 उकडलेली अंडी खाणं उपयुक्त ठरू शकतं. तिसरा टप्पा - याचा प्रभाव 10 ते 14 दिवसांपर्यंत राहतो. या टप्प्याला रिकव्हरी कालावधी (Recovery Period) देखील म्हणू शकतो. या कालावधीत रुग्ण कोरोनाच्या धोक्यापासून पूर्णतः बाहेर आलेला असतो. या काळात योग्य प्रमाणात सकस आहार घेणं आवश्यक आहे. तसंच व्यायामाचा कालावधी वाढवण्यावर भर द्यावा. यामुळे तुमची क्षमता पुन्हा वाढण्यास मदत होईल. हे वाचा -  भारतीय तरुणानं बनवलं अनोखं ब्रेसलेट; सोशल डिस्टंसिंग न पाळल्यास लागणार करंट या कालावधीत रुग्णाने अन्य व्यक्तींना भेटणं टाळावं. स्वतःला आयसोलेशनमध्ये (Isolation) ठेवावं आणि आपली सर्वतोपरी काळजी घ्यावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या